होमपेज › Kolhapur › पालिकेच्‍या गेटला कुलूप लावण्‍यावरुन कर्मचार्‍यांत वाद

पालिकेच्‍या गेटला कुलूप लावण्‍यावरुन कर्मचार्‍यांत वाद

Published On: Jun 19 2018 1:40PM | Last Updated: Jun 19 2018 1:40PMकुरुंदवाड : पुढारी ऑनलाईन

कुरूंदवाड पालिकेच्या गेटला कुलूप लावण्यावरून रात्रपाळीला असणाऱ्या कर्मचारी व अग्निशमन दलाच्या कंत्राटी कर्मचार्‍यात जोरदार वाद झाला. हमरी तुमरीवरून एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. दरम्यान हे प्रकरण हाणामारीपर्यंत जाण्याआधी नागरिकांनी व काही ज्येष्ठ कर्मचार्‍यांनी मध्यस्थी करून पुढील वाद टाळले. कर्मचाऱ्यांनी घातलेल्या या गोंधळाची शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहे. 

येथील पालिका कार्यालयाच्या रखवालीसाठी रात्रपाळीसाठी एक कर्मचारी तर अत्यावश्यक सेवेसाठी अग्निशमन दलाचे दोन कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ग्निशमन दलाचे कर्मचारी रात्री उशिरा येत असल्याने पालिका इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराला ते आल्यानंतरच कुलूप लावले जाते.

पालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याला मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यास सांगितले असता अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याने उद्धट उत्तर दिले. यावेळी संतप्त झालेल्या कर्मचारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार हमरीतुमरी सुरू झाली. अर्वाच्‍च शिवीगाळ करून परिसरात या तू्‍.-तू मै-मैची जोरदार चर्चा होती. शिवीगाळ करून हे प्रकरण हाणामारीपर्यंत जाण्याआधी नागरिकांनी व इतर कर्मचार्‍यांनी सोडवल्याने या वादावर पडदा पडला. 

संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून पालिकेच्या कर्मचाऱ्याला अपमानास्पद वागणूक मिळाल्याने संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांवर  प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी पालिकेतील कर्मचारी वर्गातून होत आहे.