Thu, Apr 25, 2019 07:57होमपेज › Kolhapur › आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी ज्येष्ठ खेळाडूंना शुभेच्छा

आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी ज्येष्ठ खेळाडूंना शुभेच्छा

Published On: Mar 06 2018 12:38AM | Last Updated: Mar 05 2018 11:50PMकोल्हापूर : प्रतिनिधी

लपांग मेन स्टेडियम, थायलंड येथे 9 ते 11 मार्च 2018 या कालावधीत होणार्‍या 23 व्या थायलंड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स संघ रवाना होणार आहे. या संघात क्रीडानगरी कोल्हापूरच्या मास्टर्स अ‍ॅथलेटिक असोसिएशनच्या खेळाडूंचाही सहभाग असणार आहे. 

दरम्यान, कोल्हापूरच्या खेळाडूंनी दैनिक ‘पुढारी’ च्या प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. 

संघात बंडू माने (वय 78), आकाराम शिंदे (78), मनोहर कुलकर्णी (75), मनोरमा कुलकर्णी (72), रघुनाथ लाड (71), बाळासाहेब भोगम (70), रावसाहेब सूर्यवंशी (65), गोरखनाथ केकरे (67), बाळासाहेब पोवार (62), जयसिंग हवालदार (55), उदय महाजन (53), नरसिंग कांबळे (50), कल्लाप्पा तिरवीर (46) यांचा समावेश आहे.