Tue, Apr 23, 2019 19:43होमपेज › Kolhapur › पोस्टाची बँक तुमच्या दारात!

पोस्टाची बँक तुमच्या दारात!

Published On: Sep 08 2018 1:31AM | Last Updated: Sep 07 2018 11:26PMकोल्हापूर : शेखर दुग्गी 

लोकांना आता घरबसल्या पोस्टात खाते उघडता येणार असून मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून पैशाचे व्यवहारही अत्यंत सोयिस्कर होणार आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेअंतर्गत या दोन्ही सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या सेवा केंद्रामुळे साहजिकच वेळ, श्रम आणि पैसा यांची बचत होणार आहे. देशात पोस्टाचे जाळे खेडोपाडी, वाड्या-वस्त्यांत पसरले आहे. बँकिंग क्षेत्राला खेड्यापर्यंत नेण्यासाठी भारतीय टपाल खात्याने इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही संकल्पना राबवली आहे. देशभरात  नुकतीच पेमेंट बँकेची सेवा सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात मार्केट यार्ड उपडाकघर, शुक्रवार पेठ उपडाकघर, उचगाव उपडाकघर आणि हेर्ले शाखा डाकघर येथे सेवा केंद्र सुरू झाले आहे.

घरबसल्या मिळणार पैसे...

एकदा खाते उघडल्यानंतर ग्राहकांना घरबसल्याही पोस्टातून पैसेही मागविता येतील. रकमेची मर्यादा 5 हजार रुपयांपर्यंत असेल. यासाठी जवळच्या पोस्ट कार्यालयाला पैसे मागणीचा मॅसेज करावा लागेल. हा मेसेज (एसएमएस) संबंधित पोस्टमास्तरकडे जाईल. पोस्ट कार्यालयातून ही रक्‍कम पोस्टमन त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवेल.

पोस्टमन काढणार खाते...

पोस्ट आणि ग्राहक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे पोस्टमन होय. या पोस्टमनच्या मदतीनेच लोकांना घरबसल्या, नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी आपले खाते उघडता येईल. खाते काढण्यासाठी पोस्टमनना विशेष प्रशिक्षणासह मोबाईल अ‍ॅप आणि थंब मशिनही देण्यात आले आहे. पोस्टमनसह ग्रामीण डाक सेवकांचाही यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.