Tue, Jul 16, 2019 02:19होमपेज › Kolhapur › मराठा आरक्षण ठिय्या आंदोलनाला वाढता पाठिंबा

मराठा आरक्षण ठिय्या आंदोलनाला वाढता पाठिंबा

Published On: Aug 04 2018 1:34AM | Last Updated: Aug 04 2018 1:04AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून दसरा चौकात सुरू असणार्‍या सकल मराठा क्रांती ठोक मार्चाच्या ठिय्या आंदोलनास गावागावांतून पाठिंबा मिळत आहे. 

सेनापती कापशी खोर्‍यातील बांधवांनी ‘लाँग मार्च’चे आयोजन केले होते. सेनापती कापशी ते कोल्हापूर असा तब्बल 60 कि.मी. दोन दिवसांचा  पायी प्रवास करून ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलनास उपस्थिती लावली.  मराठा समाजास आरक्षण देण्यासाठी होत असलेल्या विलंबाबाबत शासनाचा निषेध करण्यात आला. इतकेच नव्हे, तर आंदोलनाच्या दरम्यान  कार्यकर्त्यांवर नोंदविलेले गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच आरक्षणासाठी प्राण गमावेल्यांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली. 

सेनापती कापशी (ता. कागल) व समस्त चिकोत्रा खोर्‍यातील सकल मराठा समाजाच्या वतीने या ‘लाँग मार्च’चे आयोजन करण्यात आले होते. कापशी येथील स्वामी चौकातून गुरुवारी (दि.2) सकाळी 7 वाजता, लाँग मार्चची सुरुवात झाली. कुडीटेक, निपाणी, कोगनोळी टोल नाका मार्गे कागल येथे आल्यानंतर तेथे मुक्काम करण्यात आला. शुक्रवारी  (दि.3) सकाळी 8 वाजता, कागल येथून लाँग मार्चची आगेकूच झाली. गोकुळ शिरगाव-टेंबलाईवाडी-कावळा नाका मार्गे लाँग मार्च दसरा चौकातील आंदोलन स्थळी दाखल झाला. 

मराठा आरक्षणासाठी जाहीर पाठिंबा’ यासह ‘मराठा आरक्षणासंदर्भातील विविध फलक, भगवे ध्वज, मराठा आरक्षण लिहिलेल्या टोप्या परिधान केलेले कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. लाँग मार्चमध्ये शशिकांत खोत, नवीद मुश्रीफ, मधुकर पाटील, भैय्या माने, प्रकाश गाडेकर यांच्यासह सुमारे 700 ग्रामस्थ सहभागी झाले होते. 

आंदोलनाला पाठिंबा दिलेल्या संस्था, संघटना पुढीलप्रमाणे : 
शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघ : संस्थापक अध्यक्ष वसंतराव मगदूम, अध्यक्ष सुनील देसाई यांच्यासह सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी आंदोलनात सहभाग  घेतला. 
ढोलगरवाडी (ता. चंदगड) : प्रा. दीपक पाटील, शिवाजी तुपारे, सागर पाटील, भाऊराव पाटील, उत्तम कदम, अभिजित पाटील, श्रीनाथ माडगुळकर, गजानन कदम, भाऊराव पाटील, किरण पाटील, विशाल पाटील, विशाल नवकुडकर, समर्थ आंबी, सुभाष पाटील, लक्ष्मण गुरव. 

म्हाळुंगे तर्फ बोरगाव : पन्हाळा तालुक्यातील म्हाळुंगे तर्फ बोरगाव येथील सर्व ग्रामस्थ, तरुण मंडळ, महिला बचतगट व संस्थांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. 

ओम नागरी पतसंस्था कोल्हापूर : अध्यक्ष सुरेश इंगवले, जी. एस. पोतदार, चंद्रकांत देशमुख, विजय पाटील, प्रा. अरुण पाटील, सुरेद्र घोरपडे, राजेंद्र शिंदे, काका पाटील, श्रीकृष्ण लोखंडे, चंद्रकांत चव्हाण.  
वीरशैव लिंगायत समाज राशिवडे : अध्यक्ष रणजित तिरवत, उपाध्यक्ष कुमार मगदूम व सर्व ग्रामस्थांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. 

विविध संस्था, संघटनांचा पाठिंबा  
संभाजी ब्रिगेड (अकोला जिल्हा)चे सतीश कोळसे-पाटील, मराठा महासंघाचे शरद साळुंखे, नीलेश धुमाळे, पुरुषोत्तम धुमाळे, अभिजित धुमाळे, विकास गेंद, सागर धुमाळे, लंकेश धुमाळे, पंकज खोले, संकेत धुमाळे, सोेपान  वसू यांच्यासह अनेकांनी सकाळी पाठिंबा दिला. शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथील सागर धनवडे यांनी आंदोलनास पाठिंबा देऊन सर्व-जाती-धर्मीयांना आंदोलनास पाठिंबा देण्याचे आवाहन केले. याशिवाय, कसबा ठाणे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायत महाडिकवाडी, ग्रामपंचायत पडळचे सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते व ग्रामस्थांनी पाठिंबा दिला.  
जनसंपर्क फाऊंडेशन (पीआरओ) संघटना : राजू पाटील, संतोष खोत, विजय गवळी यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. 

सकल मराठा मोर्चा आंदोलक केर्ली : सरपंच कल्पना कांबळे, उपसरपंच अमित पाटील, तानाजी गवळी,  विश्‍वास कदम, दीपक पाटील, भीमराव पाटील, दीपक कांबळे, अशोक कुंभार, बजरंग शिंदे, व्यंकटेश इंगळे, माया गुरव, पुष्पा पोवार, सुमन चौगले, वैशाली चौगले, वंदना पाटील आदींसह ग्रामस्थांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.  

कणेरी (ता. करवीर) : येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सरपंच उज्ज्वला शिंदे, संजय कदम, उज्ज्वला पाटील, मेघा पाटील, कांचन पाटील, सुनीता गुरव, महेश शिंदे, दत्तात्रय मगदूम, यशवंत पाटील, सुनील पाटील, सूर्यकांत कदम, शिवाजी पाटील, रणजित पाटील, गजानन सूर्यवंशी  आदींसह सिद्धगिरी सहकारी दूध संस्थेच्या सर्व पदाधिकारी-सदस्यांनी पाठिंबा जाहीर केला. 
महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना : अध्यक्ष प्रकाश शिंदे, कार्याध्यक्ष सुनील वंजारी, अरविंद कुलकर्णी, संभाजी पाटील, श्रीपती तोरस्कर, कृष्णात चौगले, गजानन मुळीक, उमेश कांबळे. 
‘गोशिमा’चा पाठिंबा : मराठा आरक्षण आंदोलनास सर्व क्षेत्रांतून पाठिंबा मिळत असून शुक्रवारी गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (गोशिमा) तर्फे पाठिंबा देण्यात आला. यावेळी अध्यक्ष सुरजितसिंग पवार, उपाध्यक्ष लक्ष्मीदास पटेल, सचिव एस. एस. पाटील, खजानिस अजित आजरी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

हिंदू युवा प्रतिष्ठान : हिंदू युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अशोक देसाई, महादेव कुकडे, संजय ढाले, महेश इंगवले, बाजीराव पाटील, ज्ञानदेव पुंगावकर, दीपक सावंत, राजेंद्र सूर्यवंशी,रघू भोईटे, राजू कदम आदींनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला.  

मुस्लिम समाज केर्ली : सकल मराठा मोर्चा आंदोलक केर्ली व समस्त मुस्लिम समाज केर्लीच्या वतीने मराठा आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. यावेळी सिकंदर मुजावर, राजेखान मुजावर, हारुण मुजावर, सरदार पठाण, सरदार मुजावर, इलाही मुजावर, तौफिक मुजावर, इम्रान मुजावर, फैय्याज पठाण, मन्सूर मुजावर, अरबाज सय्यद, जुबेर मुजावर आदी उपस्थित होते. 

मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आवाहन
गेले दहा दिवस ऐतिहासिक दसरा चौकात सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे. पाठिंब्यासाठी जिल्ह्यातून जनसागर उसळला आहे. स्वखर्चाने सर्व जण येथे येत आहेत. आंदोलनाच्या नावे जर कोणी पैसे मागत असेल तर संस्था किंवा व्यक्तीने पैसे देऊ नयेत, असे आवाहन सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या संयोजन समितीने केले आहे.