होमपेज › Kolhapur › पर्यायी पूल कामासाठी यंत्रसामग्रीत वाढ

पर्यायी पूल कामासाठी यंत्रसामग्रीत वाढ

Published On: May 25 2018 1:09AM | Last Updated: May 25 2018 12:44AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

पंचगंगेवरील शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलासाठी जमीन सपाटीकरणाचे काम  युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी यंत्रसामग्रीत वाढ करण्यात आली आहे. प्राथमिक टप्प्यात केवळ एक जेसीबीवर काम सुरू असताना गुरुवारी एकूण तीन जेसीबी डोझर डंपर आणि ट्रॅक्टर अशी यंत्रसामग्री वाढविण्यात आली आहे. 

पंचगंगेवरील पर्यायी पुलाचे काम पुरातत्त्व कायद्याच्या कचाट्यात अडकले आहे. पुलाचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून केवळ  20 टक्के काम शिल्लक आहे. जिल्हा प्रशासन पोलिस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्या पुढाकाराने या पर्यायी पुलासाठी प्राथमिक टप्प्यातील कामांना सुरुवात झाली आहे. जमीन सपाटीकरण, झुडपे, माती, डबर हलविणे आदी कामे पूर्ण झाली आहेत. नवीन पुलाच्या उर्वरित अब्युबमेंट  (पिलर) च्या उभारणीसाठी लाईन आऊट घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा पिलर नदीपात्राऐवजी बाहेर घेण्याचे नियोजन सुरू असून तसे डिझाईन बनवून मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू आहे.