Wed, Nov 21, 2018 07:12होमपेज › Kolhapur › मानवाधिकार उल्‍लंघनाच्या घटनांत वाढ

मानवाधिकार उल्‍लंघनाच्या घटनांत वाढ

Published On: Dec 11 2017 1:30AM | Last Updated: Dec 10 2017 11:48PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

मानवी जीवनात प्रत्येकाला सन्मान, स्वातंत्र्य, समानता आणि आदर मिळावे हा उद्देश मानवी हक्‍क कायद्यातून पुढे आला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींनंतर 1993 साली मानवाधिकार कायदा लागू झाला. याबाबत विशेष आयोग स्थापन झाला असता तरी अधिकारांची माहिती लोकांपर्यंत अद्याप पोहोचलेली नाही असे चित्र आहे. 

मानवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला जगण्याचा अधिकार प्राप्‍त करून देणारा मानवी हक्‍क कायदा आपल्याला अनेक सन्मान प्राप्‍त करून देतो. मानवाधिकारांचा भंग झाला तर आपण येथे न्याय मागू शकतो. प्रत्येकाचे जीवन हक्‍क हे कायद्याने संरक्षित केले असतील, कोणालाही जीवनातून वंचित ठेवता येणार नाही. गेल्या काही वर्षात पोलिस यंत्रणेने मानवाधिकारांना पोखरल्याचे वारंवार पुढे येत आहे.

पोलिस कोठडीत होणार्‍या आरोपींच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. सांगली शहर पोलिस ठाण्यात अनिकेत कोथळे या तरुणाचा कोठडीत मृत्यू झाला. पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. याप्रकरणी पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. या पोलिसांनी अनिकेतचा मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेने राज्यातील नव्हेत तर देशातील पोलिसांविरोधात वातावरण ढवळून निघाले.  मानवी आयुष्यात मानवाला सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आला असला तरी त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली पाहिजे.  मानवी हक्‍कांबाबत शासन उदासीन असल्याने सर्वसामान्य व्यक्‍ती यापासून अद्यापही वंचित आहे.