Wed, Feb 19, 2020 10:51होमपेज › Kolhapur › ‘त्या’ डॉक्टरांची बँक खाती सील; कागदपत्रे ताब्यात

‘त्या’ डॉक्टरांची बँक खाती सील; कागदपत्रे ताब्यात

Published On: Dec 08 2017 1:37AM | Last Updated: Dec 08 2017 1:19AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

शहरातील चार नामांकित डॉक्टर्सवर आयकर खात्याने टाकलेल्या छापासत्राचे काम दुसर्‍या दिवशीही सुरू होते. संबंधित डॉक्टरांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती, गुंतवणूक, बँक लॉकर्स यांची माहिती घेण्याचे काम सुरू असून बँक खाती सील करण्यात आली आहेत.

शहरातील डॉक्टर्स व त्यांच्या हॉस्पिटलवर आयकर खात्याने बुधवारी छापे टाकले. गुरुवारी संबंधित डॉक्टरांनी गेल्या सहा वर्षांत भरलेल्या आयकराची माहिती घेण्याचे काम आयकर पथके करत आहेत. डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणात जमीन व्यवहारात गुंतवणूक केल्याची माहिती उघडकीस आल्याचे समजते. याबाबत झालेल्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदीची माहिती दिवसभर घेतली जात होती. या डॉक्टरांची ज्या बँकांमध्ये खाती आहेत, ती सील करण्यात आली आहेत. बँक लॉकर्समधून कागदपत्रांसह मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्याची चर्चा आहे. कारवाईदरम्यान कोणतेही व्यवहार करण्याला बंदी आणण्यात आली आहे. संबंधित डॉक्टर्सनी किती आयकर भरला आहे, त्यांचे नेमके उत्पन्‍न किती, अन्य गुंतवणूक कोठे केली आहे, याच्या माहितीसाठी काही कागदपत्रे ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.