Mon, Sep 24, 2018 07:26होमपेज › Kolhapur › नूतन सर्किट हाऊसचे उद्घाटन

नूतन सर्किट हाऊसचे उद्घाटन

Published On: May 28 2018 1:42AM | Last Updated: May 27 2018 10:08PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

सुमारे पाच कोटी खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे उभारण्यात आलेल्या तीन मजली नूतन शासकीय विश्रामगृहाचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ताराबाई पार्क विश्रामगृह परिसरात अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून  हे विश्रामगृह साकारण्यात आले आहे. राजकीय नेत्यांचा राबता आणि अंबाबाईसह पर्यटनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता उपलब्ध विश्रामगृहातील कक्ष अपुरे पडत आहेत. याचा विचार करून पालकमंत्री पाटील यांच्या पुढाकाराने सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नवीन 12 व्हीआयपी कक्षाचे तीन मजली विश्रामगृह बांधण्यात आले. प्रत्येक मजल्यावर चार कक्ष अशा पद्धतीने बांधकाम करण्यात आले आहे. हरित इमारत संकल्पनेतून हे बांधकाम करण्यात आले. भोजन कक्ष, स्वयंपाकगृह, परिषद कक्ष आदींचा समावेश आहे. 

या समारंभास आ. अमल महाडिक, प्रभारी मुख्य वास्तुशास्त्रज्ञ संजय गेडाम, गोकुळचे संचालक बाबा देसाई, महापालिका स्थायी सभापती आशिष ढवळे, नगरसेवक विलास वास्कर राजसिंह शेळके, विजय जाधव, राहुल चिक्‍कोडे, बी. बी. यादव, अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, प्रवीण जाधव, विद्युतचे कार्यकारी अभियंता ए. बी. चौगुले, कार्यकारी अभियंता बी. एम. उगले, शाखा अभियंता अविनाश पोळ, ठेकेदार व्ही. के. पाटील आदी उपस्थित होते.