Sat, Jul 20, 2019 10:38होमपेज › Kolhapur › पोस्टाच्या व्यवसायवृद्धी कक्षाचे उद्घाटन

पोस्टाच्या व्यवसायवृद्धी कक्षाचे उद्घाटन

Published On: Dec 14 2017 2:18AM | Last Updated: Dec 13 2017 11:57PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

भारतीय डाक विभागाने स्पीड पोस्ट  रजिस्टर एडी व पार्सल बुकिंगसाठी ग्राहक व व्यवसायिकांसाठी स्वतंत्र व्यवसायवृद्धी विभाग सुरू केला आहे. गोवा परिक्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल डॉ. एन. विनोदकुमार यांच्या हस्ते बुधवारी कोल्हापूर रेल्वे मेल सर्व्हिसेसच्या कार्यालयात या कक्षाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रवर डाक अधीक्षक रमेश पाटील, सहायक डाक अधीक्षक संजय देसाई, पोस्टल स्टोअर डेपोचे अधीक्षक अशोक खोराटे, रेल्वे डाक सेवेचे अधीक्षक जी. के. सेलिंग आदी उपस्थित होते.

नागरिक आणि व्यवसायिकांच्या पत्रव्यवहार व दळणवळणातील वाढत्या गरजा एकाच छताखाली तसेच ग्राहकांच्या सोयीनुसार विस्तारित वेळेमध्ये उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हा कक्ष सुरू करण्यात आला असून ग्राहकांना आता जलद सेवा मिळणार असल्याची माहिती डॉ. विनोदकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

डॉ. विनोदकुमार म्हणाले, स्पीड पोस्ट, बिझनेस पोस्ट, बिझनेस पार्सल, एक्स्प्रेस पार्सल इत्यादीच्या अधिक प्रमाणावर असणारे टपाल गोळा करून ते बुकिंग करण्याची सुविधा येथे मिळणार आहे. टपाल गोळा करून ते पाकिटामध्ये भरणे, पत्ता चिटकविणे, फ्रॅकिंग या प्रकारचे प्रीमेलिंगची सेवाही देण्यात येणार आहे. या विभागात विपणन अधिकार्‍यांची कुशल पथके असतील. याशिवाय ग्राहकांच्या व्यवसाय ठिकाणापासून मोठ्या प्रमणात टपाल जमा करण्यासाठी आऊटसोर्स केलल्या पोस्टल एजंट ची टीम असेल. विभागात हाय स्पीड आरएमएफएस, बारकोड स्कॅनर, प्रिंटर आणि कॉम्प्युटर ही अत्याधुनिक यंत्रणा असणार आहे. सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत ही सुविधा मिळणार आहे. 

इंटरनॅशनल ट्रॅक्ड पॅकेट सेवा

ग्राहकांसाठी इंटरनॅशनल ट्रॅक्ड पॅकेट सेवा ही सुरू करण्यात आली. आशिया पॅसिफिक विभागातील 12 देशांमध्ये शिपमध्ये पाठविण्यासाठी ही सर्वोत्कृष्ट आर्थिकदृष्ट्या परवडणारी सेवा आहे. 2 किलोपर्यंतची पॅकेट, पिक अप सुविधा, नुकसानभरपाई, अधिक प्रमाणात बुकिंगसाठी सवलत ही या सेवेची वैशिष्ट्ये आहेत.  

स्पीड पोस्ट सर्वात जलद सेवा

‘कॅग’ च्या सर्वेक्षणात पोस्टाची ‘स्पीड पोस्ट’ सेवा ही भारतातील सर्वात जलद सेवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुरिअर सेवा देणार्‍या इतर कंपन्यांपेक्षाही स्पीड पोस्ट सेवा जलद असल्याचे ‘कॅग’ने अहवालात म्हटले आहे. लोकसभेत ‘कॅग’च्या समितीने हा अवाहल सादर केला होता.