Wed, Jul 17, 2019 18:10होमपेज › Kolhapur › गळक्या बसमध्ये प्रवाशांना छत्रीचा आधार

गळक्या बसमध्ये प्रवाशांना छत्रीचा आधार

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 26 2018 11:54PMचंदगड : प्रतिनिधी

चंदगड आगाराच्या सर्वच बसेस गळक्या आहेत. त्यामुळे टपावरून प्रवाशांच्या अंगावर पावसाच्या जलधारा कोसळतानाचे चित्र दिसते. बसमध्ये पाणी टिपकत असल्याने प्रवासी अक्षरशः वैतागले आहेत. गळक्या गाड्यांमध्ये प्रवासी छत्री धरून बसलेले असतात. 

गेल्या अनेक वर्षांपासून या आगाराकडे जुन्या आणि गळक्या गाड्या आहेत. एक कि. मी. अंतरावर लांब असतानाच चंदगड आगाराची गाडी येत आहे, असे आवाजावरून समजते. बर्‍याच गाड्या नादुरुस्त असूनही रस्त्यावर फिरवल्या जातात. पावसाळ्यात तर गाड्यांचे ब्रेक लागत नाहीत. काही गाड्यांचे स्टार्टर लागत नसल्यामुळे प्रवाशांना उतरून ढकल स्टार्ट करावे लागते. 

सध्या शाळा, कॉलेज सुरू झाली आहेत. यावर्षी जादा पाऊस असल्याने  या गाड्यांचे पितळ उघडे पडले. संपूर्ण गाड्यांमध्ये पाणीच-पाणी झाले होते. सुक्या असलेल्या आसनावर काही प्रवासी बसले होते. तर गळत असलेल्या आसनावर छत्री धरून बसावे लागले होते. चंदगड आगार जिल्ह्यात नफ्यात असतानाही गाड्यांची देखभाल दुरुस्ती केली जात नाही. याकडे आगार प्रमुखांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.