Mon, Jun 24, 2019 16:38होमपेज › Kolhapur › प्रचंड प्रतिसादात ‘एज्यु-दिशा’ प्रदर्शनाची सांगता

प्रचंड प्रतिसादात ‘एज्यु-दिशा’ प्रदर्शनाची सांगता

Published On: May 29 2018 1:39AM | Last Updated: May 29 2018 12:48AMकोल्हापूर : प्रतिनिधी  

विद्यार्थी व पालकांच्या प्रचंड प्रतिसादात संजय घोडावत विद्यापीठ प्रस्तुत दै. ‘पुढारी’ आयोजित ‘एज्यु-दिशा 2018’ प्रदर्शनाची सोमवारी  सांगता झाली. तज्ज्ञांच्या प्रेरक व्याख्यानासाठी मोठी उपस्थिती होती. विविध स्टॉलवर माहिती घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली.  ‘एज्यु दिशा’ प्रदर्शनामुळे आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळाले, अशा शब्दांत विद्यार्थी व पालकांनीही आवर्जुन प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या.

संजय घोडावत विद्यापीठ प्रस्तुत दै. ‘पुढारी’ आयोजित ‘एज्यु-दिशा 2018’  पॉवर्ड बाय पिंपरी-चिंचवड एज्यूकेशन ट्रस्ट व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, पुणे या शैक्षणिक प्रदर्शनाची सोमवारी उत्साहात सांगता झाली.  कमला कॉलेज परिसरातील डॉ. व्ही. टी. पाटील मेमोरियल हॉल व प्रांगणात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनासाठी सहयोगी प्रायोजक म्हणून विश्‍वकर्मा विद्यापीठ, सहप्रायोजक चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन्स, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे व सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट  हे लाभले. शनिवारपासून या प्रदर्शनास प्रारंभ झाला होता.

प्रदर्शनात  राज्यातील विविध नामवंत शिक्षण संस्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते.  दै. ‘पुढारी’ ने विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधीची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्याने  विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिल्या. प्रदर्शनास सकाळी दहा  वाजल्यापासूनच विद्यार्थी व पालकांची रात्री उशिरापर्यंत वर्दळ सुरू होती. प्रदर्शन हॉलमधील विविध शिक्षण संस्थांच्या स्टॉलवर माहिती घेण्याबरोबरच आवर्जुन व्याख्यानास उपस्थिती लावली.