Sun, Jul 21, 2019 01:53होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप 3398  मोजणी प्रकरणे प्रलंबित

कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप 3398  मोजणी प्रकरणे प्रलंबित

Published On: Jun 29 2018 12:55AM | Last Updated: Jun 28 2018 11:51PMम्हाकवे : डी. एच. पाटील

कोल्हापूर जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागातील 8,445 प्रकरणी मोजणी करून निकाली काढण्यात आली असून, अद्याप मोजणीसाठी आलेली 3,398 प्रकरणे प्रलंबित आहेत. जिल्ह्यात 78 पदे रिक्‍त असतानाही 70 टक्के प्रकरणे निर्गत करण्यात यश आले आहे. 

जिल्ह्यात सर्वात जास्त प्रकरणे करवीर तालुक्यात (2397) दाखल झाली असून, सर्वात कमी प्रकरणे गगनबावडा (199) तालुक्यातून दाखल झाली आहेत. जिल्ह्यात एकूण 11,843 प्रकरणे जमीन मोजणी साठी आली होती. त्यापैकी मार्च 18 अखेर 8,445 प्रकरणे निकाली निघाली आहेत. तर, 3398 प्रकरणे प्रलंबित आहेत. जमिनीची मोजणी ही साधारणः नोव्हेंबर ते मार्चअखेर मोठ्या प्रमाणात होते. पावसाळ्यात चिखल व दलदल असल्याने मोजणीत अडचणी येतात. त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयाकडे पेंडिंग प्रकरणे अधिक आहेत.  मात्र, 78 कर्मचारी कमी असतानाही या कार्यालयाने 70 टक्के प्रकरणे निकाली काढली आहेत.