Sun, Oct 20, 2019 02:12होमपेज › Kolhapur › अर्जुननगर परिसरात दोन गटांत राडा; तिघे जखमी

अर्जुननगर परिसरात दोन गटांत राडा; तिघे जखमी

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 17 2017 12:49AM

बुकमार्क करा

मुरगूड/निपाणी : प्रतिनिधी

अर्जुननगर (ता. कागल) हद्दीतील एका क्लबजवळ शनिवारी रात्री आठच्या सुमारास दोन गटांत राडा झाला. यावेळी झालेल्या हाणामारीत विजय (वय 27) व सुमीत (22, दोघे रा. निपाणी), संकेत (21, रा. यमकर्णी) हे तिघे युवक जखमी झाले. यामधील दोघांवर निपाणीतील म. गांधी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून कोल्हापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. 

दोन गटांत राडा कशाबद्दल झाला, याची माहिती मिळू शकली नाही. विजय व सुमीत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या दोघांना लोखंडी हत्याराने मारहाण झाल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुरगूड पोलिसांनी घटनास्थळ व म. गांधी रुग्णालयाला भेट देऊन माहिती  घेतली. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद मुरगूड पोलिसांत झाली नव्हती.