Sun, Jul 21, 2019 16:11
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › दहावीच्या पुस्तकात २०१ चुका

दहावीच्या पुस्तकात २०१ चुका

Published On: Jul 09 2018 1:19AM | Last Updated: Jul 08 2018 10:27PMनूल ः संजय थोरात

राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दहावीच्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलला आहे. मात्र, बदललेल्या पाठ्यपुस्तकात तब्बल 201 चुका आढळल्या असून, या चुका दुरुस्त करून शिक्षकांनी अध्यापन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. संकेतस्थळावर दुरुस्त्यांचा तपशील दिला असला तरी विद्यार्थ्यांनी खरेदी केलेल्या पाठ्यपुस्तकांत या चुका तशाच राहणार आहेत.

गतवर्षी इयत्ता नववीचा तर यंदा दहावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. बदललेल्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. 15 जूनला शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. शाळेमध्ये दहावीच्या अध्यापनाचे काम सुरू केल्यानंतर बदललेल्या पाठ्यपुस्तकांत अनेक चुका असल्याने शिक्षकांचे निदर्शनास आले. 

या चुका शिक्षकांनी अभ्यासक्रम मंडळाला कळविल्यानंतर चुकांची दुरुस्ती करून सुधारित मजकूर पाठ्यपुस्तक मंडळाने संकेतस्थळावर टाकला आहे.

कुमारभारती (हिंदी) माध्यम ः 10, हिंदी लोकभारती ः 4, हिंदी लोकवाणी ः 4, गुजराती कुमारभारती ः 33, गुजराती साहित्यभारती ः 8, गरवी गुजराती ः 18, गणित भाग एक (मराठी माध्यम) ः 6, गणित भाग दोन ः 5, गणित भाग एक (इंग्रजी माध्यम) ः 4, गणित भाग दोन ः 2, गणित भाग एक (हिंदी माध्यम) ः 2, गणित भाग दोन ः 5, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक (मराठी माध्यम) ः 8, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक (इंग्रजी माध्यम) ः 30, विज्ञान और प्राद्यौगिकी भाग एक (हिंदी माध्यम) ः 8, विज्ञान और प्राद्यौगिकी भाग दोन ः 12, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन (मराठी माध्यम) ः 9, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन (इंग्रजी माध्यम) ः 16, इतिहास (इंग्रजी माध्यम) ः 13 आणि भूगोलाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकांत प्रत्येकी एक अशा तब्बल 201 चुका आढळल्या आहेत.

इतक्या चुका कशा?

कोणत्याही इयत्तेचा अभ्यासक्रम तयार करताना संबंधित विषय समिती व अभ्यास गट समिती सदस्यांकडून तयार केला जातो. यासाठी मोठी प्रक्रिया राबविली जाते. एवढ्या प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात चुका आढळल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. शिक्षकांना अध्यापन करताना पाठ्यपुस्तक मंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन चुकांचा सुधारित मजकूर पाहूनच अध्यापन करावे लागणार आहे.