Tue, Apr 23, 2019 19:34होमपेज › Kolhapur › कोल्हापुरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बाह्यवळण रस्ता

कोल्हापुरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बाह्यवळण रस्ता

Published On: Apr 13 2018 1:17AM | Last Updated: Apr 13 2018 12:48AMमुंबई : चंद्रशेखर माताडे 

कोल्हापूर शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बाह्यवळण रस्ता काढण्याचे नियोजन आहे. मात्र, या रस्त्यासाठी घरे व शेतजमीन देण्यास शेतकर्‍यांचा विरोध असून यातून मार्ग काढण्यासाठी संबंधित मतदारसंघांतील लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात येणार अहे. कोल्हापूरचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात ही बैठक झाली. 

कोकणातून येणारी सर्व वाहने   कोल्हापूर शहरातून प्रवास करत मग शहराबाहेर जातात. कोल्हापूर हे तीर्थक्षेत्र असल्याने अंबाबाई, जोतिबा, बाहुबली, कणेरीमठ यासारख्या धार्मिक क्षेत्रांमुळे कोल्हापुरात वाहनांची प्रचंड गर्दी होते. त्याचबरोबर कोल्हापूर शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने व अनेक विभागांची कार्यालये  शहरातच असल्याने त्याचीही गर्दी असते. त्यामुळे शहरात होणारी वाहतुकीची कोंडी ही नित्याची गोष्ट झाली आहे.  यावर उपाय म्हणून कोकणातून येणारी व कोकणाकडे जाणारी वाहने ही शहरात न येता थेट शहराबाहेरून जावीत यासाठी बाह्यवळण रस्त्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कोकणला जाण्यासाठी प्राधान्याने याच रस्त्याचा उपयोग केला जातो. अलीकडच्या काही वर्षांत मुंबई-गोवा या महामार्गाची जी दुर्दशा झाली आहे व त्याच्या विस्तारीकरणाचे काम रेंगाळले आहे ते पहाता, मुंबईहून कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना कराड-चिपळूण किंवा त्याहीपेक्षा जलद मार्ग म्हणून कोल्हापूरच्या रस्त्याचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे होणार्‍या वाहतुकीच्या कोंडीत ऐन सणासुदीच्या दिवसांत भरच पडत  आहे. 

Tags : Kolhapur, order,  reduce, traffic, congestion, Kolhapur city, plan, out, road, extraction