Sun, Aug 18, 2019 14:21होमपेज › Kolhapur › दिवसभर ढगाळ वातावरण पावसाच्या हलक्या सरी

दिवसभर ढगाळ वातावरण पावसाच्या हलक्या सरी

Published On: Mar 16 2018 12:45AM | Last Updated: Mar 16 2018 12:45AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील बहुतेक भागात दिवसभर ढगाळ वातावरण होते. सकाळपासून उष्मा मोठ्या प्रमाणावर जाणवत होता. सायंकाळनंतर ढगांचा गडगडाट सुरू झाला. मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, असे वाटत असताना सायंकाळी सातच्या सुमारास शहरासह जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा आदी परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. 

गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण दिसू लागले आहे. ढगाळ वातावरण आणि उष्मा अशा हवामानामुळे सकाळी नऊ वाजल्यापासून उकाडा जाणवत होता. ढगाळ हवामानामुळे वळवाचा पाऊस पडेल, असे वाटत होते. मात्र, सायंकाळनंतर काही परिसरात ढगांचा गडगडाट सुरू झाला. यानंतर रात्री शहरासह जिल्ह्यातील काही भागात हलक्या सरी पडल्या.

हलक्या सरी पडू लागल्याने जोरदार पाऊस येईल, या धास्तीने रस्त्यावरील वाहनधारक आणि पादचारी घाईगडबडीने घराकडे सुसाट जात असल्याचे चित्र होते. तर काही जण दक्षता म्हणून दुकानाच्या, टपर्‍यांच्या आडोशाला उभे राहून पाऊस आलाच तर भिजू नये म्हणून थांबले होते. प्रत्यक्षात मात्र तुरळक म्हणाव्या अशा हलक्या सरी पडल्या.