Mon, Jun 24, 2019 21:10होमपेज › Kolhapur › दत्त देवस्थानसमोर सुट्या नाण्यांचा प्रश्‍न

दत्त देवस्थानसमोर सुट्या नाण्यांचा प्रश्‍न

Published On: Jul 05 2018 1:38AM | Last Updated: Jul 04 2018 11:07PMनृसिंहवाडी : विनोद पुजारी

एक, दोन, पाच, दहा रुपयांच्या नाण्यांची मोठ्या प्रमाणाची रक्‍कम स्वीकारण्यास नृसिंहवाडी कार्यक्षेत्रातील बँकानी असमर्थतता व्यक्‍त केली आहे. त्यामुळे या नाण्यांचे काय करायचे, असा प्रश्‍न तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी दत्त देवस्थानसमोर पडला आहे. 

नृसिंहवाडी देवस्थानच्या कार्यक्षेत्रात बँक ऑफ महाराष्ट्र, फेडरल बँक, महालक्ष्मी को-ऑप. बँक, भरत अर्बन बँक आदी बँका येतात. स्टेट बँक-शिरोळ, बँक ऑफ इंडिया व गणेश बँक (दोन्ही कुरुंदवाड) आदि बँकेशी कमी अधिक प्रमाणात देवस्थानचा आर्थिक व्यवहार होतो आहे. राष्ट्रीयीकृत बँक पाच हजारांच्या आत या नाण्यांची रक्‍कम स्वीकारतात.  या दबावापोटी कमीत कमी दहा व जास्तीजास्त पंचविस हजारांची सुट्टी नाणी स्वीकारत आहेत. देवस्थानकडे पंचवीस हजार रुपयांची नाणी कशी-बशी बँकेत जमा होतात. पुढील सुट्या नाण्यांची रक्कम स्वीकारण्याबाबत बँकाना वारंवार विनंती करावी लागत आहे. मुख्य बँकेच्या पदाधिकारी व अध्यक्षानी संबंधित शाखा अधिकार्‍यांच्याबरोबर या प्रश्‍नावर चर्चा करून मार्ग काढणे आवश्यक आहे. सुट्या पैशांची रक्कम असूनही तिचे मूल्य नोंदण्यास अडचण येत आहे. 

...अखेर देवस्थानने दिली बँकाना पत्रे 

नृसिंहवाडी दत्त देवस्थानने कार्यक्षेत्रातील बँकाना सुट्टी नाणी स्वीकारावीत, अशी  पत्रे दिली आहेत. प्रथमच एक, दोन, पाच, दहा रुपयांच्या नाण्यांबाबतचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. या सुट्या नाण्यांबाबत शासनाने तसेच रिझर्व्ह बँकेने आवश्यक तो खुलासा करणे आवश्यक आहे, असे मत देवस्थान कार्य क्षेत्रातून व्यक्‍त होत आहे.