Tue, Nov 20, 2018 11:33होमपेज › Kolhapur › मनपा कर्मचार्‍यावर खंडणीप्रकरणी गुन्हा

मनपा कर्मचार्‍यावर खंडणीप्रकरणी गुन्हा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

ओढ्यावरील यल्‍लम्मा मंदिरातील पुजारी सुनील विलास मेढे यांच्याकडे लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी महापालिका कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दत्ता महादेव पवार (रा. सानेगुरुजी वसाहत) असे संशयिताचे नाव आहे.

फिर्यादी सुनील मेढे (वय 33, रा. यल्‍लम्मा मंदिर) हे मंगळवार पेठेतील यल्‍लम्मा मंदिरात पुजारी आहेत. याठिकाणी दत्ता पवार हेदेखील मदतनीस म्हणून जात असतात. एक वर्षापासून दत्ता पवार हे सुनील मेढे यांच्याकडे 1 लाखाची मागणी करीत होते. पैसे दिले नाही तर मंदिरात येऊ देणार नाही, अशी धमकी पवार याने दिली होती.

यामुळे मेढे यांनी पन्‍नास हजार रुपये दिले. याच कारणातून 22 नोव्हेंबरला सुनील मेढे यांना दत्ता पवार याने मारहाण केली. खंडणी दिली नाही तर जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे सुनील मेढे यांनी राजारामपुरी पोलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.