Mon, Jun 17, 2019 14:15होमपेज › Kolhapur › तुडयेत ‘स्वाभिमानी’ने ऊस वाहतूक रोखली

तुडयेत ‘स्वाभिमानी’ने ऊस वाहतूक रोखली

Published On: Dec 14 2017 2:18AM | Last Updated: Dec 14 2017 12:23AM

बुकमार्क करा

चंदगड : प्रतिनिधी

म्हाळुंगे येथील इको-केन शुगर्स (नलवडे) व राजगोळी खुर्द येथील ओलम अ‍ॅग्रो (हेमरस) या दोन्ही साखर कारखान्यांनी सन 2016-17 मध्ये गळितास गेलेल्या उसाचा दुसरा 200 रुपये हप्‍ता दिला नसल्याच्या निषेधार्थ बुधवारी तुडये येथे चंदगड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस वाहतूक रोखली.

नलवडे व हेमरस साखर कारखान्यांनी दि. 4 नोव्हेंबर 2017 रोजी तहसील कार्यालयात प्रशासनाबरोबर झालेल्या चर्चेत सन 2016-17 मध्ये गळितास गेलेल्या उसाचा दुसरा हप्‍ता प्रतिटन 200 रुपयांप्रमाणे शेतकर्‍यांच्या खात्यांवर जमा करण्याचे मान्य केले होते. 

मात्र, या कारखान्यांनी अद्यापही शेतकर्‍यांच्या खात्यांवर पैसे जमा केले नसल्याच्या निषेधार्थ आज तुडये येथे ऊस वाहतूक रोखली. तालुकाध्यक्ष बाळाराम फडके, पं. स. सभापती जगन्‍नाथ हुलजी, प्रा. दीपक पाटील, नवनीत पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.