Tue, Nov 19, 2019 12:51होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात विजेअभावी उद्या पाणीपुरवठा बंद

कोल्हापुरात विजेअभावी उद्या पाणीपुरवठा बंद

Published On: May 06 2018 1:08AM | Last Updated: May 06 2018 12:59AMकोल्हापूर : प्रतिनिधी


कोल्हापूर शहरातील संपूर्ण ‘ए’, ‘बी’ व ‘ई’ वॉर्ड व त्यास संलग्नित उपनगरे, ग्रामीण भागात सोमवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. वीज कंपनीकडून वीजपुरवठा खंडित होणार असल्याने पाणीपुरवठा विभागाच्या शिंगणापूर, आपटेनगर, कसबा बावडा पंम्पिंग स्टेशनकडील पाणी उपसा बंद राहणार आहे. त्यामुळे शहरात पाणीपुरवठा होणार नाही. तसेच मंगळवारी (8 मे) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

‘ए’, ‘बी’ वॉर्डमधील फुलेवाडी, रिंगरोड परिसर, कणेरकरनगर परिसर, निचितेनगर परिसर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर परिसर, जीवबा नाना परिसर, आपटेनगर-रिंगरोड, 
महाराष्ट्र नगर, सुर्वेनगर परिसर, बापूरामनगर, साळोखेनगर, तपोवन परिसर, देवकर पाणंद, नाळे कॉलनी, संभाजीनगर परिसर, विजयनगर परिसर, शहाजी वसाहत, श्री कृष्ण कॉलनी परिसर, रायगड कॉलनी, जरगनगर, एल. आय. सी. कॉलनी परिसर, आर. के. नगर, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, रेसकोर्स नाका, हॉकी स्टेडियम परिसर, आयसोलेशन हॉस्पिटल परिसर, नेहरूनगर, सुभाषनगर, शेंडापार्क, राजेंद्रनगरबरोबरच ‘ई’ वॉर्डातील  शुगर मिल परिसर, कसबा बावडा, लाईन बझार, नागाळा पार्क, रमणमळा, न्यू पॅलेस परिसर, ताराबाई पार्क, न्यू शाहूपुरी परिसर, स्टेशन रोड परिसर, बी. टी. कॉलेज परिसर, साईक्स एक्स्टेन्शन, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, कावळा नाका परिसर, सदर बाजार, विचारे माळ, कदमवाडी, भोसलेवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, लोणार वसाहत, मार्केट यार्ड परिसर, शिवाजी उद्यमनगर परिसर, राजारामपुरी, टाकाळा व माळी कॉलनी परिसर, दौलतनगर, प्रतिभानगर, पांजरपोळ परिसर, शास्त्रीनगर, जवाहरनगर, सम्राटनगर परिसर, राजेंद्रनगर परिसर, स्वातंत्र्यसैनिक परिसर आदी ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेच्या वतीने शहरवासीयांना सहा टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येणार आहे.