Sun, Feb 17, 2019 07:00होमपेज › Kolhapur › राजर्षी शाहू शिक्षण शिष्यवृत्तीची प्रभावी अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी

राजर्षी शाहू शिक्षण शिष्यवृत्तीची प्रभावी अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी

Published On: Aug 02 2018 1:58AM | Last Updated: Aug 02 2018 1:06AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राज्य शासनाने यावर्षीपासून सुरू केलेल्या राजर्षी शाहू शिक्षण शिष्यवृत्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा; अन्यथा कारवाई करू, असा इशारा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिला. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बैठक झाली.

ओबीसीसह ईबीसी सवलत प्राप्‍त विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने ही शिष्यवृत्ती योजना यावर्षींपासून सुरू केली आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना 50 टक्के शुल्क सवलतीवर प्रवेश देणे बंधनकारक आहे. या योजनेची अनेक ठिकाणी प्रभावी अंमलबजावणी होत नसून, काही महाविद्यालयांकडून पूर्ण शुल्क भरण्याबाबत सक्‍ती केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी सुभेदार यांनी उच्चशिक्षण विभागातील अधिकार्‍यांची बैठक घेतली.

या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबाजवणी करा. या योजनेचा लाभ देण्यास जे महाविद्यालय टाळाटाळ करेल, अशा महाविद्यालयांवर सक्‍त कारवाई करा, असे आदेश सुभेदार यांनी अधिकार्‍यांना दिले.