Tue, Dec 10, 2019 12:38होमपेज › Kolhapur › बेकायदेशीररित्या रिक्षात गॅस भरणा : तिघांना अटक

बेकायदेशीररित्या रिक्षात गॅस भरणा : तिघांना अटक

Published On: Dec 22 2017 12:26AM | Last Updated: Dec 22 2017 12:26AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

घरगुती वापराच्या सिलेंडरमधील गॅस अवैधरित्या रिक्षात भरताना तिघांना अटक करण्यात आली. वाजिद सलिम फरास (वय 35, रा. बाराईमाम तालीम), दिनेश बाबूराव भिलवडे (31, रा. खंडोबा तालीमनजीक), रिक्षा चालक आशिष चंद्रकात थोरात (39, रा. सानेगुरुजी वसाहत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 19 सिलेंडर, वजनकाटा, गॅस भरण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. गुरुवारी रात्री मिरजकर तिकटी परिसरात ही कारवाई करण्यात आली. 

मिरजकर तिकटीकडून दैवज्ञ बोर्डिंगकडे जाणार्‍या रस्त्यावर वाजिद फरास हा रिक्षात गॅस भरुन देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुरुवारी रात्री याठिकाणी असणार्‍या पत्र्याच्या शेडवर राजवाडा पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणी दिनेश भिलवडे हा रिक्षात गॅस भरत असताना मिळून आला. पोलिसांनी भरलेले 17 सिलेंडर, 2 अर्धवट भरलेले तर 2 रिकामे अशा एकूण 19 गॅस टाक्या जप्त केल्या.