Wed, Nov 21, 2018 21:33होमपेज › Kolhapur › इचलकरंजीतील व्यापारी पंचवीस कोटींना अडकले

इचलकरंजीतील व्यापारी पंचवीस कोटींना अडकले

Published On: Dec 04 2017 1:38AM | Last Updated: Dec 04 2017 12:27AM

बुकमार्क करा

इचलकरंजी : प्रतिनिधी 

अहमदाबाद येथील एका कापड व्यापार्‍याने दिवाळे काढले असून, त्याच्याकडे इचलकरंजी शहरातील कापड व्यापार्‍यांचे सुमारे 25 कोटी रुपये अडकल्याची जोरदार चर्चा आहे. जीएसटीच्या दणक्यातून यंत्रमाग व्यवसाय सावरत असतानाच या दिवाळे प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

 अहमदाबाद येथील एका व्यापार्‍याने प्रोसेसिंग युनिट भाड्याने घेतले होते. शहरातील काही व्यापारी त्याला मोठ्या प्रमाणात कापड देत होते. काही दिवसांपासून या व्यापार्‍याने दिवाळे काढल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे त्याने काही वर्षांपूर्वीच दिवाळे काढल्याची चर्चा होती; मात्र त्यावेळी दिवाळखोरीचा आकडा कमी होता. आता या दिवाळ्याची रक्कम मोठी असून शहरातील व्यापार्‍यांचे 25 ते 30 कोटी रुपये अडकल्याचे बोलले जात आहे.