होमपेज › Kolhapur › राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा बुधवारपासून  

राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा बुधवारपासून  

Published On: Dec 25 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 12:50AM

बुकमार्क करा

इचलकरंजी : प्रतिनिधी

 मनोरंजन मंडळासह विविध संस्थांतर्फे आयोजित 19 व्या राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेस बुधवारी (दि.27)  श्रीमंत घोरपडे नाट्यगृह येथे प्रारंभ होणार आहे. यादिवशी दुपारी 1 वाजता स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा अलका स्वामी व रंगकर्मी पवन खेबुडकर यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेत 37 संघांनी सहभाग नोंदवला आहे. 27 ते 30 डिसेंबर दरम्यान दररोज दुपारी 1 पासून येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात एकांकिका सादर होणार आहेत. 27 रोजी इचलकरंजीच्या ब्लॅकबॉक्स थिएटरची ‘खोडवा’, इचलकरंजीच्या निसर्गमित्र प्रतिष्ठानची ‘चार की चाळीस’, कोल्हापूरच्या शिवम नाट्यसंस्थेची ‘प्रश्‍न मनाच्या पटलावर’, सांगलीच्या आर.पी.फौंडेशनची ‘छुटा छेडा’, पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजची ‘नदीकाठचा प्रकार’, कराडच्या परिसस्पर्शची ‘वाघ आला रे आला’, पंढरपूरच्या नाट्य परिषदेची ‘चंद्रपूरच्या जंगलात’, सांगलीच्या अथांग एंटरटेन्मेंटची ‘कपान’, बदलापूरच्या व्ही.बी.एंटरटेन्मेंटची ‘ती ते आणि..’ या एकांककिका सादर होतील.

28 रोजी इचलकरंजीच्या आम्ही कलाकारची ‘चिंगी’, सांगलीच्या कलातरंगची ‘पूर्णविराम’, मिरजेच्या नाट्यांगणची ‘कम्पॅनियन’, इचलकरंजीच्या प्रयास प्रॉडक्शनची ‘पंधरा मिनिटे’, गडहिंग्लजच्या डॉ.घाळी महाविद्यालयाची ‘कोपरा’, रत्नागिरीच्या रसिक रंगभूमीची ‘अर्थवर्म’, मिरजेच्या रिसोर्स कॉम्प्युटरची ‘मोक्ष’, रत्नागिरीच्या चतुरंग प्रतिष्ठानची ‘रसिक’, इचलकरंजीच्या जयचंद प्रॉडक्शनची ‘मानस’, इचलकरंजीच्या डीकेएएससी कॉलेजची ‘आमच्या गावात आर्ची’ या एकांकिका सादर होतील.29 रोजी कोल्हापूरच्या शिंदे अ‍ॅकॅडमीची ‘राखेतून उडाला मोर’, इचलकरंजीच्या अविरत कला मंचची ‘अफू’, कोल्हापूरच्या विश्‍वयोगा संस्थेची ‘कैफियत’, इचलकरंजीच्या अवनी थिएटर्सची ‘मॅडम’, देवगडच्या समर्थ कला आविष्कारची ‘संदूक’, पुण्याच्या स्वप्न पब्लिक ट्रस्टची ‘येगं येगं सरी’, पुण्याच्या संक्रमणची ‘माझ्या छत्रीचा पाऊस’, पुण्याच्या प्रिय कलाकृतीची ‘हात धुवायला शिकवणारा माणूस’, इचलकरंजीच्या रंगयात्राची ‘बयाबाँ’, पुण्याच्या समर्थ कला अ‍ॅकॅडमीची ‘अ‍ॅनिमल प्लॅनेट’, या एकांकिका सादर होतील.

30 रोजी यड्रावच्या शरद इन्स्टिट्यूटची ‘ती सात वर्षे’, पुण्याच्या फोटो मंत्राची ‘म्युटेशन’, पुण्याच्या थ्री एसएम प्रॉडक्शनची ‘शोधला शिवाजी तर’, सावंतवाडीच्या नाट्यसृजनची ‘मुमुक्षांच्या यज्ञात’, पुण्याच्या आकारची ‘अहंम् आवाम् वयम्’, सातार्‍याच्या निर्मिती नाट्यसंस्थेचे ‘म्युटेशन’, सातार्‍याच्या समर्थ कला अकादमीची ‘स्मृती’, कोल्हापूरच्या एम.बी.थिएटर्सची ‘सुलतान’ या एकांकिका सादर होणार आहेत.