Wed, Nov 21, 2018 22:28होमपेज › Kolhapur › इचलकरंजीत आमदारांच्या राजीनाम्याची मागणी

इचलकरंजीत आमदार कार्यालयावर ठिय्या आंदोलन

Published On: Jul 30 2018 5:11PM | Last Updated: Jul 30 2018 5:10PMइचलकरंजी : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी सकल मराठा समाजातर्फे आमदार सुरेश हाळवणकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यात आमदार सुरेश हाळवणकरांच्या राजीनाम्याची मागणी करत शंखध्वनी करण्यात आला.

यावेळी विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला. तसेच खासदार राजू शेट्टी, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. 

यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक इरगोंडा पाटील, प्रदीप काळे आदींसह फौजफाटा तैनात करण्यात आला होता.