Tue, Aug 20, 2019 15:12होमपेज › Kolhapur › तरुणाकडून पिस्तूल, सात जिवंत काडतुसे जप्त 

तरुणाकडून पिस्तूल, सात जिवंत काडतुसे जप्त 

Published On: Dec 28 2017 1:33AM | Last Updated: Dec 28 2017 1:13AM

बुकमार्क करा
इचलकरंजी : प्रतिनिधी 

येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने पिंटू उपेंद्र राय (वय 32, सध्या रा. तुळजाभवानीनगर इचलकरंजी, मूळ रा.जहाँगीरपूर, जि.वैशाली, बिहार) याला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व सात जिवंत काडतुसे असा 76 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पिंटू हा नॉटिंग कंत्राटदार असून केवळ नॉटिंग व्यवसायातील स्पर्धेतून पिस्तूल जवळ बाळगल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तुळजाभवानीनगर येथे एका परप्रांतीय युवकाकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पथकाच्या कर्मचार्‍यांनी पिंटूवर पाळत ठेवली. आज बुधवारी कर्मचार्‍यांनी त्याला पिस्तूलसह ताब्यात घेतले.

त्याच्याकडून पोलिसांना एक पिस्तूल व सात जिवंत काडतुसे मिळून आली. विशेष म्हणजे दीड वर्षापूर्वी त्याने हातकणंगले येथील रेल्वे रुळावर हवेत गोळीबार केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सात जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. पिंटू याने हे पिस्तूल बिहारमधून खरेदी केले आहे. पिंटू नॉटिंगचे कंत्राट घेतो. या व्यवसायात सध्या तीव्र स्पर्धा असून गुंड प्रवृत्तीचा त्यामध्ये शिरकाव झाला आहे. यापूर्वी नॉटिंगच्या स्पर्धेतून हाणामारी, धमकावणे असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे भीतीपोटी पिस्तूल जवळ बाळगल्याचे पोलिसांना सांगितले. ही कामगिरी उपअधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहाजी निकम, महेश कोरे, वैभव दड्डीकर, ज्ञानेश्‍वर बांगर, राजू पट्टणकुडे, विजय तळसकर, सागर पाटील, रवी कोळी, फिरोज बेग, संदीप मळघणे आदींनी केली.