Mon, Jul 15, 2019 23:41होमपेज › Kolhapur › इचलकरंजीत अतिक्रमणे हटविली

इचलकरंजीत अतिक्रमणे हटविली

Published On: Dec 06 2017 2:02AM | Last Updated: Dec 05 2017 11:42PM

बुकमार्क करा

इचलकरंजी : वार्ताहर

इचलकरंजी शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर आज, मंगळवारी नगरपालिकेसह पोलिस व महसूल यंत्रणेने  हातोडा घातला. यात 22 हून अधिक हातगाडे, खोकी आदींचा समावेश होता. याचबरोबर रस्त्यालगत लावण्यात आलेले डिजिटल फलक, कमानी आदींसह हातगाड्यांवर लावलेले घरगुती सिलिंडर जप्त करण्यात आले. किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता दिवसभर कारवाई सुरूच होती. नगरपालिकेसह प्रशासन मोठ्या पोलिस फौजफाट्यासह कारवाईसाठी रस्त्यावर उतरले. 

कोल्हापूर नाका येथून सकाळी कारवाईला प्रारंभ झाला. प्रांताधिकारी समीर शिंगटे, पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे, मुख्याधिकारी डॉ.प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे, पोलिस निरीक्षक सतीश पवार आदींच्या उपस्थितीत सुमारे 40 हून अधिक पालिका कर्मचार्‍यांनी अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली. कोल्हापूर रस्त्यावरील चिकन 65, वडापाव आदींचे हातगाडे, पान टपरी आदींची अतिक्रमणे काढण्यात आली. त्याचबरोबर रस्त्याकडेला लावण्यात आलेले दुकानांचे फलक, इतर साहित्य, मंडप, वडापावचे  गाडे, रस्त्याच्या दुतर्फा असलेले हातगाडे, खोकी व इतर साहित्य जप्त करण्यात आले. हातगाड्यांवर लावण्यात आलेले पाचहून अधिक घरगुती सिलिंडरही पुरवठा निरीक्षक अविनाश सूर्यवंशी यांच्या पथकाने जप्त केले. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे.