दानोळी : वार्ताहर
वादातीत असलेल्या इचलकरंजीच्या अमृत योजनेच्या विषयी मुंबईत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला इचलकरंजीचे लोकप्रतिनिधी आणि वारणा काठावरील लोकप्रतिधी उपस्थित होते.
यावेळी अमृत योजना वारणेवरून नाही, तर कृष्णा नदीवर हरिपूर संगमा पासून ते मजरेवाडी पर्यंत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाच्या सर्वेक्षण अहवाला नुसार निर्णय घेऊन योजना राबवणार असा निर्णय घेण्यात आला. इचलकरंजीची सध्याची चालू कृष्णा योजना दुरुस्तीसाठी शासन दोन टप्यात आवश्यक निधी देणार आहे त्याचबरोबर दानोळी गावकऱ्यांवर 2 मे च्या आंदोलनात दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेणार. आदी निर्णय घेण्यात आले. यात डॉ. एन.डी.पाटील आणि विक्रांत पाटील यांच्या मागणी नुसार इचलकरंजी व वारणा काठ ग्रामस्थ आंदोलन मागे घेणार असल्याचा निर्णय झाल्याचे समजताच, दानोळीत फटाक्यांची आतषबाजी व साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.