होमपेज › Kolhapur › आयटीआय ऑनलाईन प्रवेश; 30 जूनपर्यंत मुदत

आयटीआय ऑनलाईन प्रवेश; 30 जूनपर्यंत मुदत

Published On: Jun 18 2018 1:16AM | Last Updated: Jun 17 2018 11:46PMकोल्हापूर : प्रतिनिधी

शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) ऑगस्ट 2018 च्या ऑनलाईन प्रवेशाचे नवीन वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने नुकतेच जाहीर केले आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्जाची मुदत 30 जूनपर्यंत आहे.

कोल्हापूर शासकीय आयटीआयमध्ये 31 व्यवसाय अभ्यासक्रमाच्या 1319 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दि. 1 जूनपासून ऑनलाईन अर्ज भरणे, अर्जात दुरुस्तीस प्रारंभ झाला आहे. आजअखेर 451 अर्जांचे निश्‍चितीकरण झाले आहे. प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी शासकीय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये 30 जूनपर्यंत रोज सकाळी 10 ते 11 यावेळेत नि:शुल्क प्रवेशप्रक्रियेबाबत मार्गदर्शन सत्र घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश वेळापत्रक पाहूनच ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन कोल्हापूर शासकीय आयटीआयचे प्राचार्य यतीन पारगावकर यांनी केले.

प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे     1 ते 30 जून
प्रवेश अर्ज निश्‍चित करणे    4 जून ते 2 जुलै
पहिल्या प्रवेश फेरीसाठी विकल्प सादर करणे    4 जून ते 3 जुलै
प्राथमिक गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहीर    5 जुलै (सकाळी 11 वा.)
गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे    5 ते 6 जुलै
अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहीर करणे    10 जुलै (सायं. 5 वा.)
पहिल्या प्रवेश फेरीसाठी प्रत्यक्ष प्रवेश कार्यवाही करणे    11 ते 15 जुलै
दुसर्‍या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन विकल्प सादर करणे    11 ते 16 जुलै
दुसर्‍या प्रवेश फेरीसाठी प्रवेश प्रत्यक्ष कार्यवाही करणे    21 ते 25 जुलै
तिसर्‍या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन विकल्प सादर करणे    21 ते 26 जुलै
तिसर्‍या प्रवेश फेरीसाठी प्रत्यक्ष प्रवेश कार्यवाही करण    31 जुलै ते 3 ऑगस्ट
चौथ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन विकल्प सादर करणे    31 जुलै ते 4 ऑगस्ट
चौथ्या प्रवेश फेरीसाठी प्रत्यक्ष प्रवेश कार्यवाही करणे    8 ते 11 ऑगस्ट
नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे व निश्‍चित करणे    25 जुलै ते 11 ऑगस्ट
समुपदेशन फेरी    13 ऑगस्ट (सायं. 5 वा.
खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थास्तरावरील प्रवेश    2 जुलै ते 31 ऑगस्ट