Thu, Apr 18, 2019 16:02होमपेज › Kolhapur › हैदराबाद संघानं फसवलंच; अभ्याची इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती!(Video)

हैदराबाद संघानं फसवलंच; अभ्याची इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती!(Video)

Published On: May 29 2018 11:24AM | Last Updated: May 29 2018 11:40AMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

आयपीएलच्या फायनलच्या एक दिवस आधी ‘मी हैदराबादकडनं खेळणार, शिखऱ्या अन् मी धुळ्ळा उडवणार’ असे म्हणणारा कोल्हापूरचा ‘अभ्या’ अर्थात अभि रोकडे फायनलच्या मैदानात दिसलाच नाही. अभ्या हैदराबादकडनं खेळला असता तर कदाचीत फायनलचे चित्रच पालटले असते. तो कुठे गेला. का खेळला नाही. याचे उत्तर त्याने स्वत:च एका नवा व्हिडिओतून दिले आहे.
या व्हिडिओत ‘अभ्या’ म्हणतोय...

अभ्याला प्रश्न विचारला जातोय, अभि इंटरनॅशनल क्रिकेटमधून तुम्ही निवृत्ती घेताय याचे कारण कळेल का आम्हाला? 

त्यावर अभ्याचे उत्तर,

माझ्यासोबत जे झाले ते काय सांगू, मला आता फोन करतात की तुम्हाला सामन्यात खेळायची संधी देतो. साडेतीन हजार रूपये आणि चिकनचे ताट देतो म्हटले होते. धोनीनं कमी पैसे दिले म्हणून मी हैदराबादला येतो म्हटलं. त्यांनी मला सांगितलं की, येतानाचे पैसे तू दे आम्ही इथं आल्यावर तुला पैसे देतो. 

त्यांच्या भरवशावर मी इथंन तिथं गेलो. तर तिथं गेल्यावर मला म्हणत्यात की, छोटा हत्तीत बसायला जागा नाही. शिखर धवन म्हटला मीच ड्रायव्हरच्या बाजूला बसून चाललोय. तुला बघ मागं कुठ जागा हाय का? हे ऐकल्यावर मी म्हटलं ‘लोमकाळत कोण जाणार बाबा? मी काय येत नाही..जावा तुमचं तुम्हीच ..तिथंन येताना मला फक्त ८०  रूपये दिले. तीन ट्रकास्नी हात करून मी घरी आलो..

...आणि अभ्याच्या डोळ्यात पाणी तरळले

क्रिकेट क्षेत्रात  किनी आमचं बी योगदान हाय..पण खिळून घेत्यात कुटं...खऱ्या टॅलेंटला कुजवत्यात..असं सांगत अभ्या ढसाढसा रडला.

पुढं तो म्हणतो, आय लव्ह यू ‘क्रिकेट प्रेमी’ माझी तुम्ही बॅटींग बघितली नाही ..खर मला बी वादळी खेळी करायची हाय..मला बी लय कायतर करायचं होत क्रिकेट क्षेत्रात पण मला हे करू देत नाहीत.

यावर समोरचा व्यक्ती अभ्याचे सांत्वन करत म्हणतो..‘असूं दे आभि तुम्ही रडू नगोसा’

त्यावर अभ्या म्हणतो...चांगल्या खेळाडूंना तुम्ही कुजवताय..धन्यवाद मला काय बोलायचच नाही यावर..सगळ्या क्षेत्रात मला बास झालयं आता ..माझी बॅट सुद्‌धा आता मी चौदाशे रूपयांना विकणार हाय..कोण घेतंय का बघतो.

आयपीएलच्या आधी धोनीने अभ्याला फोन केला होता..क्लिक करा आणि वाचाशिखऱ्या आणि मी आज धुळ्ळा उडवणार’(VIdeo)

अभि रोकडे हा कोल्हापूरचा हौशी कलाकार असून तो स्वत:च्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ शेअर करत असतो. अस्सल कोल्हापूरी भाषा हे त्याचे वैशिष्ठ्य आहे. कोल्हापूरच्या मातीतल्या त्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.