Mon, Apr 22, 2019 05:41होमपेज › Kolhapur › वाट पाहीन, पण... एस.टी.नेच जाईन

वाट पाहीन, पण... एस.टी.नेच जाईन

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 10 2018 11:37PMकोल्हापूर : प्रतिनिधी

गावी निघालेले, खोळंबलेले प्रवासी आणि वेतनवाढीतील गफलत कमी करावी, यासाठी दोन दिवस ताटकळत थांबून असलेले एस.टी.तील कर्मचारी, अशा घालमेलीत मध्यवर्ती बसस्थानक सुन्न होता. शनिवारी रात्री संप मिटल्याचे जाहीर होताच सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवासी आणि कर्मचार्‍यांची लगबग वाढू लागली, पण रविवारी पहाटेपासून खर्‍या अर्थाने एस.टी.ची वाहतूक सुरळीत सुरू झाली. 

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केलेली वेतनवाढ अमान्य करत एस.टी.तील कर्मचारी संपावर गेले होते. त्यामुळे एस.टी.तील कर्मचारी शुक्रवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले होते. हा संप अघोषित असल्यामुळे प्रशासनाची थोडी पंचायत झाली, अखेर मान्यता प्राप्त कामगार संघटनेने कर्मचार्‍यांसाठी संपात सहभागी होऊ, असा इशारा दिला. त्यानंतर शनिवारी रात्री महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना,इंटक च्या पदाधिकार्‍यांबरोबर परिवहन मंत्र्यांनी चर्चा केली आणि त्यातून तोडगा योग्य तोडगा निघाल्यानंतर कर्मचार्‍यांनी संप मागे घेतला. 

संपाच्या कालावधीत गेली दोन दिवस खाजगी कंपनीच्या शिवशाही बसेस सुरु होत्या, तर काही ठिकाणी लाल गाड्या सोडल्या जात होत्या. गेल्या दोन दिवसात 2200 फेल्यापैकी अवघ्या 120 फेर्‍या गेल्या, 90 टक्के बस वाहतूक टप्प झाली होती. शनिवारी रात्री संप मिटल्यानंतर रविवारी सकाळपासून एसटी कर्मचार्‍यांनी जल्लोष करत गाड्यांचा ताबा घेण्यासाठी आगार गाठले,  तर कंट्रोलरनी जागा पकडून गाड्यांच्या नोंदी सुरु केला, तर टाईम टेबल प्रमाणे कोणत्या फलाटवर कोणती गाडी आहे, याची माहिती देणे सुरु केले. 

कर्मचार्‍यांनी संप केल्यामुळे दोन दिवस एसटी वाहतूक बंद होती, हे प्रवाशांना समजले होते, त्यामुळे गेली दोन दिवस मध्यवर्ती बस परिसर किरकोळ प्रवासी होते. मात्र रात्रीच संप मिटल्याने रविवारी सकाळपासूनच गर्दी वाढू लागली. दुपारी मध्यवर्ती बस स्थानकावर मोठी गर्दी झाली होती.