Sat, Nov 17, 2018 14:14होमपेज › Kolhapur › भीमा कोरेगावप्रकरणी नार्को टेस्टसाठी तयार : भिडे

भीमा कोरेगावप्रकरणी नार्को टेस्टसाठी तयार : भिडे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

शिरोली पुलाची : वार्ताहर

दलित बांधव आमचेच आहेत. काही हिंदूविरोधी पक्षांकडून हिंदूदलित समाजात फूट पाडण्यासाठीच भीमा कोरेगाव दंगल घडवली. अशा हिंदूविरोधी जातीयवाद्यांकडून  गेल्या तीन महिन्यांपासून मला  दोषी ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी ब्रेन मॅपिंग नार्को टेस्टसाठी तयार आहे.  माझ्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी राज्यातील 38 जिल्ह्यांतील श्री  शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व सर्व हिंदुत्ववादी  संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर  काढण्यात येणार असल्याची माहिती शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी दिली. 

रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन व किल्ल्यांवरून खडा पहारा  योजनांसंबंधी आयोजित हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत  होते. या बैठकीत सुरेश यादव यांनी भिडे गुरुजींवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी सन्मान महामोर्चाचे बुधवार (दि. 28) रोजी सकाळी 11 वा. आयोजन केले आहे. त्यासाठी  हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बिंदू चौकात हजर राहण्याचे आवाहन  केले. या बैठकीला शिवसेना उपजिल्हाप्रमुख माने, माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण आदी उपस्थित होते.

Tags : Koregao Bhima, Narco Test, Sambhaji Bhide, Police, Kolhpaur


  •