Thu, Jun 20, 2019 01:57होमपेज › Kolhapur › 'मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत' चा कोल्‍हापूरात एल्‍गार

'मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत' चा कोल्‍हापूरात एल्‍गार

Published On: Jan 28 2018 3:57PM | Last Updated: Jan 28 2018 3:57PMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

‘मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत’ असा नारा देत विविध मागण्यांसाठी लिंगायत समाजबांधवांनी कोल्‍हापूरमध्ये एल्गार पुकारला आहे. लिंगायत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्‍थिती लावली.
लिंगायत समाजाला स्‍वतंत्र धर्माची मान्‍यता मिळावी यासाठी अखिल भारतीय लिंगायत समाजातर्फे राज्यव्‍यापी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. लिंगायत समाजाच्या महामोर्चाला पाठिंबा दर्शविण्यासाठी जिल्‍ह्यातील राजकीय नेत्यांबरोबर सामाजिक क्षेत्रातील व्‍यक्‍तिंनी हजेरी लावली. जिल्‍ह्यातील विविध सामाजिक, व्‍यावसायिक संघटनांकडूनही या महामोर्चाला पाठिंबा दर्शविण्यात आला. 

यावेळी लिंगायत समाजाच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. लिंगायत समाजाच्या मागण्यांबाबत मुख्यंमत्र्यांसोबत चर्चा करण्याचे अश्वासन त्यांनी  दिले आहे. लातूर, सांगली, कर्नाटकनंतर कोल्हापूरात या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील विविध  जिल्‍ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येन या मोर्चाला हजेरी लावली. या महामोर्चामध्ये महिलांनीही मोठा सहभाग नोंदवला. 

‘लिंगायत स्वतंत्र धर्म, मी लिंगायत’ असा उल्‍लेख असलेल्या टोप्‍या, बसवण्णांचे छायाचित्र असलेले झेंडे घेऊन लिंगायत समाज बांधव या मोर्चात सहभागी झाला होता. स्‍वतंत्र धर्माच्या मागणीला जिल्‍ह्यातील विविध अशा ७७ संघटनांनी पाठिंबा दर्शविला. या मोर्चाद्वारे संबंध राज्याला एक मोर्चाचा आदर्श घालून देत आहात. लोकसभेत सक्षमपणे मी आपली बाजू मांडणार असल्याचे सांगत मोर्चाचा एक वेगळा आदर्श या कोल्‍हापूरने घालून दिल्याबद्दल लिंगायत समाजाला धन्‍यवाद देत असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

लिंगायत धर्माच्या या राज्यव्यापी महामोर्चाला शाहू महाराज यांचा वारसदार म्‍हणून मी लिंगायत समाजाच्या महामोर्चाला  संपूर्ण घराण्याचा पाठिंबा मी जाहीर करत असल्याचे समरजित घाटगे यांनी सांगितले. तर आमदार राजेश क्षीरसागर यांनी येत्‍या अर्थसंकल्‍प अधिवेशनात लिंगायत समाजाच्या समस्या मांडून त्‍यांना न्‍याय मिळवून देण्याचा प्रयत्‍न करणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी सर्व आमदार मिळून आम्‍ही लढा उभारू असे अश्वासन दिले. डॉ. आमदारा सुजित मिणचेकर यांनी बसवण्णांच्या क्रांतिकारी विचार ज्या समाजाने जपले, त्यांचा वारसा पुढे चालवला त्या धर्माला मान्यता मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी पक्षातर्फे बसवण्णांच्या क्रांतिकारी विचारांसाठी विधानसभेत आवाज बुलंद करू, असे अश्वासन आमदार हसन मुश्रीफ यांनी दिले. तर माजी आमदार संजय घाटगे यांनीही याप्रसंगी पाठिंबा दर्शविला. 

या मोर्चामध्ये खास सहभाग नोंदविण्यासाठी पंजाबहून आलेले सिमरनजीत सिंग मान यांनी लिंगायत समाजाचा राजकारणात जसा वाटा आहे त्या प्रकारे देशासाठी लढणार्‍या सैनिकांमध्ये वाटा उचलणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी लिंगायत रेजिमेंटची स्‍थापना करणे गरजेचे असल्याची भावना देखील व्‍यक्‍त केली.  या मोर्चाप्रसंगी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, अध्यक्ष यांनीही मत व्‍यक्‍त केले. समाजाचे आयोजक सरलाताई पाटील, राजशेखर तंबाके आदी आयोन समितीतील पदाधिकार्‍यांनीही मनोगत व्‍यक्‍त केली.

कोल्‍हापूरातील महामोर्चात बसवण्णांचेही दर्शन