Wed, Jun 26, 2019 23:30होमपेज › Kolhapur › चार लाख रुपयांच्या वसुलीसाठी पतीचे अपहरण

चार लाख रुपयांच्या वसुलीसाठी पतीचे अपहरण

Published On: Jan 01 2018 1:55AM | Last Updated: Jan 01 2018 12:41AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

चार लाख रुपयांच्या वसुलीसाठी पतीचे अपहरण करण्यात आल्याची फिर्याद संगीता तानाजी भोगम (वय 40, रा. भोगमवाडी, करवीर) यांनी करवीर पोलिसांत दिली. याप्रकरणी शंकर पाटील व बंडा ऊर्फ शशांक पाटील (रा. पाडळी खुर्द, ता. करवीर)  यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

तानाजी भोगम यांनी बंडा पाटील याच्याकडून चार लाख रुपये उसणे घेतले होते. या बदल्यात शेत विक्रीचा व्यवहार झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले. व्यवहार अपूर्ण राहिल्याने या दोघांनी वसुलीसाठी तगादा लावला होता. गुरुवारी (दि. 28) बंडा पाटील याने फोन करून तानाजी यांना भोगमवाडीतील शेतात बोलावले. यानंतर तानाजी घरी परतलेच नाही.  संगीता यांनी ही माहिती नातेवाईक व ग्रामस्थांना दिली. शोध घेऊनही तानाजी  मिळून न आल्याने शनिवारी रात्री करवीर पोलिसांत फिर्याद दिली. 

शंकर पाटील याच्या विरोधात सांगलीत फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तर, बंडा पाटीलवर 2015 मध्ये करवीर पोलिस ठाण्यात मारामारीचा गुन्हा नोंद आहे.