Tue, Nov 13, 2018 08:20होमपेज › Kolhapur › बिनधास्तपणे जंगली प्राण्यांची शिकार!

बिनधास्तपणे जंगली प्राण्यांची शिकार!

Published On: Jan 11 2018 1:07AM | Last Updated: Jan 10 2018 11:43PM

बुकमार्क करा
चंदगड/दोडामार्ग : प्रतिनिधी

काही महिन्यांपूर्वी तिलारी नदीतून मृत अवस्थेत तसेच सर्व पंजे छाटलेला एक बिबट्या आला होता. अशाप्रकारे वारंवार होणार्‍या शिकारीमुळे जंगली प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहेत. शिकारीमुळे प्राण्याच्या काही जाती नष्ट होण्याच्या मार्गावरच आहेत. दोडामार्ग तिलारी धरण क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात  प्राण्यांची शिकार होत असल्याचे  अनेकवेळा उघड झाले आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातही मोर, लांडोर यांचीही छुप्या पद्धतीने शिकार केली जात असल्याचे बोलले जाते. याकडेही संबंधित वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे. दोन वर्षांपूर्वी तिलारी जंगल क्षेत्रात शासनाने लावलेल्या कॅमेर्‍यामध्ये  सांबराची  शिकार केलेली शिकार्‍यांची टोळी कॅमेर्‍यात कैद झाली होेती. असे अनेक प्रकार उघडकीस येत असून वनविभागाने वेळीच या शिकार्‍यांवर नियंत्रण मिळवणे अत्यंत गरजेचे आहे .

पैसा कमविण्यासाठी शिकार!

प्राण्याची शिकार करून त्यांच्या मांस विक्रीतून पैसा कमावण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते. एखाद्या प्राण्याची शिकार करून त्याच्या मांसाची चोरीछुपे विक्री केली जाते. या मांसाच्या बदल्यात  भरमसाठ पैसा मिळत असल्याने  मोठ्या प्रमाणात शिकार केली जात असल्याचे बोलले जात आहे. 
वनखाते प्राण्यांच्या रक्षणासाठी विविध योजना राबविते; परंतु या योजना कागदावरच राहतात. त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही परिणामी वन्यप्राण्यांची शिकार सुरूच आहे.