Sun, Jul 21, 2019 09:51होमपेज › Kolhapur › दीड लाखाचे चंदन जप्‍त; एकास अटक

दीड लाखाचे चंदन जप्‍त; एकास अटक

Published On: Apr 21 2018 1:00AM | Last Updated: Apr 21 2018 12:01AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

राधानगरी जंगलातून चोरून आणलेल्या दीड लाखाच्या चंदनासह निखिल नामदेव कापसे (वय 19, रा. मागले गल्‍ली, हनिमनाळ, गडहिंग्लज) याला शहर उपअधीक्षकांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून 80 किलोची चंदनाची लाकडे व चोरीची मोटारसायकल जप्‍त करण्यात आली.

शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या पथकातील पोलिसांना मध्यवर्ती बसस्थानक परिसरात निखिल कापसे संशयितरित्या फिरताना मिळून आला. त्यांनी निखिलजवळील मोटारसायकलबाबत विचारणा केली असता ती चोरीची असल्याचे उघड झाले. त्याने ही मोटारसायकल मंगळवार पेठेतून चोरल्याचे सांगितले. 

निखिल कापसे सध्या राधानगरीतील सरवडे गावी राहण्यास आहे. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता चंदनाची लाकडे चोरून विकत असल्याची कबुली दिली. राधानगरीतील सरवडे गावी शेतात त्याने पोत्यात चंदनाची लाकडे लपवून ठेवली होती. पोलिसांनी येथे छापा टाकून चार पोती चंदनाची लाकडे, कोयता जप्‍त केला. 

 

Tags : kolhapur, kolhapur news, crime, andalwood seized, One arrested,