Mon, Aug 19, 2019 06:57होमपेज › Kolhapur › चला, स्मरणशक्‍तीचे रहस्य जाणून घ्यायला

चला, स्मरणशक्‍तीचे रहस्य जाणून घ्यायला

Published On: Apr 19 2018 1:35AM | Last Updated: Apr 18 2018 10:56PMकोल्हापूर : प्रतिनिधी

मुलांची स्मरणशक्‍ती वाढावी, ते अधिक बुद्धिमान व्हावेत, या हेतूने  दै. ‘पुढारी’ अंकुर क्‍लब आणि ऋषी संस्कृती विद्या केंद्र यांच्या संयुक्‍त विद्यमाने ‘हंड्रेड पर्सेंट मेमरी प्रोगाम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज (दि.19) शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी 4 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सातवी ते दहावीतील विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांसाठी असणारा हा कार्यक्रम मोफत आहे. या कार्यक्रमातून एकाग्रता आणि स्मरणशक्‍ती कशी वाढवावी, मेंदूची क्षमता याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

तसेच 200 पानांच्या पुस्तकातील संपूर्ण विषयाचा आढावा दोन मिनिटांत घेतला जाऊ शकतो. या कलेद्वारे मानवी मेंदू एखादे चित्र पाहून त्यातील घटक सेंकदाच्या दशलक्षांश इतक्या कमी वेळेत आठवण्याची क्षमता धारण करतो. वर्षभराचा अभ्यासक्रम 100 टक्के स्मृतीने एक महिन्यात पूर्ण करता येतो. हे कोणत्या संकल्पनेतून साध्य होते याची माहिती या कार्यक्रमातून मिळणार आहे. अधिक माहितीसाठी  संपर्क 7676909280, 94225819,  8805024242.