Sun, Jul 21, 2019 02:06होमपेज › Kolhapur › महाडिकांनी ‘गोकुळ’मध्ये दक्षिणमधील किती जणांची भरती केली? : खोत

महाडिकांनी ‘गोकुळ’मध्ये दक्षिणमधील किती जणांची भरती केली? : खोत

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 23 2018 1:15AMउजळाईवाडी : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात (गोकुळ) शासन स्तरावर नोकरभरतीला स्थगिती असूनही सत्ताधारी गटाकडून 429 जणांची भरती केली. या भरतीत आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील किती गरीब व गरजू लोकांची भरती केली त्यांची नावे जाहीर करावीत, असे आवाहन माजी जिल्हा परिषद  उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी केले.

नेर्ली (ता. करवीर) येथील संत रोहिदास समाज मंदिराच्या पायाभरणी समारंभात खोत बोलत होते. माजी गृह राज्यमंत्री आ. सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

आ. पाटील म्हणाले, ‘अच्छे दिन’ येणार, असे सांगून सत्तेत आलेल्या सरकारचे ‘अच्छे दिन’ आले; मात्र जनतेचे ‘बुरे दिन’आले आहेत. खोटी आश्‍वासने देऊन सत्तेवर आलेल्या सरकारला जनता येणार्‍या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.