Sat, Jan 19, 2019 08:34होमपेज › Kolhapur › आशा, पोषण आहार संघटनांचा मोर्चा

आशा, पोषण आहार संघटनांचा मोर्चा

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 18 2018 1:25AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

सिटू संलग्नित आशा वर्कर्स  आणि शालेय पोषण आहार संघटनांनी  बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर संयुक्त मोर्चा काढला. यानंतर अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 
आशा वर्कर्सना महिन्याला 10 हजार आणि गटप्रवर्तकांना 15 हजार वेतन लागू करा, तर आरोग्य सेवेचे खासगीकरण थांबवा, केंद्रीय किचन पद्धत कायमची हद्दपार करा, शालेय पोषण आहार कर्मचारी यांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा द्या, अशा मागण्या शालेय पोषण आहार संघटना कर्मचार्‍यांनी केल्या आहेत.

मोर्चात कॉ. नेत्रदीपा पाटील, डॉ. सुभाष जाधव, कॉ. सुभाष निकम, सौ. कविता अमिनभावी, सौ. उज्ज्वला पाटील, अ‍ॅड. सुनीता जाधव, संगीता कामते, सौ. वैशाली पाटील, मनीषा पाटील, सुप्रिया गुदले यांच्यासह मोठ्या संख्येने आशा कर्मचारी सहभागी झाले होते. 

केंद्रीय किचन पद्धत कायमची रद्द करावी. लाभार्थ्यांना मिळणार्‍या थेट सेवांच्या दर्जात सुधारणा करावी. कोणत्याही परिस्थितीत योजनेचे खासगीकरण व रोख रक्कम हस्तांतरण करण्याचा प्रकार करू नये अशामागण्या आहेत. संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य ए. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात कॉ. भगवान पाटील, प्रा. आर. एन. पाटील, सौ. पूनम बुगटे, सौ. विद्या नारकर, मनोज ढवळे, रावजी पाटील, दगडू कुमठेकर,  आदींचा समावेश होता.