Tue, Apr 23, 2019 01:38होमपेज › Kolhapur › शतकी परंपरेतील ज्येष्ठ फुटबॉलपटूंचा सन्मान

शतकी परंपरेतील ज्येष्ठ फुटबॉलपटूंचा सन्मान

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

क्रीडानगरी कोल्हापूरला रांगड्या फुटबॉल खेळाची शतकी परंपरा लाभली आहे. ही परंपरा निर्माण करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थतीत मैदान गाजविणार्‍या ज्येष्ठ फुटबॉलपटूंचा विशेष सन्मान सोमवारी शिवाजी पेठेत करण्यात आला. कोल्हापूर फेटा, आकर्षक स्मृतिचिन्ह आणि पेहराव, असे सत्काराचे स्वरूप होते.   

फुटबॉल खेळाला व खेळाडूंना लाखो रुपयांचे भक्‍कम पाठबळ देण्याच्या उद्देशाने आयोजित ‘अटल चषक’ फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने या विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. उभा मारुती चौकात झालेल्या सत्कार समारंभास ज्येष्ठ फुटबॉलपटू-प्रशिक्षक आप्पासाहेब वणिरे, शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी आ. सुरेश साळोखे, सदाभाऊ शिर्के, अजित राऊत, श्री नेताजी तरुण मंडळाचे अध्यक्ष राजू साळोखे, सुरेश जरग यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक संदीप देसाई यांनी केले. सूत्रसंचालन अशोक देसाई यांनी केले. संयोजन ‘केएसडीआय’चे अध्यक्ष सुजय पित्रे, तुषार देसाई, हेमंत अराध्ये, हेमंत कांदेकर, राजेंद्र राऊत, प्रदीप साळोखे, दिग्विजय मळगे, राजू साठे, अमित शिंत्रे, शेखर वळीवडेकर, विवेक वोरा, दीपक सुतार आदींनी केले.   

फुटबॉल वेलफेअर फंड...

कोल्हापूरचा फुटबॉल सर्वदूर पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन महेश जाधव यांनी केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोल्हापूरचा फुटबॉल विकसित झाला असून आज शतकी फुटबॉल परंपरेला सोन्याचे दिवस प्राप्त झाले आहेत. अटल चषक स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉलपटूंना विविध योजनांचे पाठबळ देण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. लाखो रुपयांचा वर्षाव करणार्‍या या स्पर्धेबरोबरच ‘कोल्हापूर फुटबॉल वेलफेअर फंड’ निर्माण करून याच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदतीची ग्वाही जाधव यांनी दिली. आप्पासाहेब वणिरे यांनी कोल्हापूरच्या फुटबॉलचा विकास व्हायला पाहिजे तसा न झाल्याची खंत व्यक्‍त करताना लिंबाच्या चतकोर फोडीवर पायात बूट न घालता सामने खेळल्याच्या आठवणींना उजाळा दिला. केवळ कोल्हापूरपुरते न खेळता राज्य आणि देशपातळीवर विजयी घोडदौड करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

सुजित चव्हाण यांनी ‘अटल’ चषक स्पर्धा फुटबॉल परंपरेला बळ देणारी ठरेल, असा विश्‍वास व्यक्‍त केला. अनेक जण मंत्री होतात; पण लोकांसाठी भरभरून करण्याची दानत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या पालकमंत्र्यांकडेच असते, असे आवर्जुन त्यांनी सांगितले.  

Tags : Kolhapur, Kolhapur News, Honor, senior, footballers, century tradition


  •