Sat, Sep 22, 2018 03:16होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात हिंदुत्ववाद्यांचाही मोर्चा

कोल्हापुरात हिंदुत्ववाद्यांचाही मोर्चा

Published On: Jan 03 2018 2:03PM | Last Updated: Jan 03 2018 2:03PM

बुकमार्क करा
कोल्हापूर - पुढारी ऑनलाईन 

कोल्हापुरात पुकारलेल्या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले असून, चौकात चौकात तणाव आहे. दरम्यान, राज्यात पुकारण्यात आलेल्या बंद विरोधात हिंदुत्तववादी संघटनांनी मोर्चा काढला. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. आंदोलन करा पण, नुकसान करू नका, असे आवाहन आमदार क्षीरसागर यांनी केले असून, नुकसान केलेल्यांना अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 
महाद्वार रोड, गुजरीत परिसरातून पापाची तिकटी, महापालिका या मार्गावर आमदार क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोठ्या प्रमाणावर तरुण सहभागी झाले होते. शहरात बंदला हिंसक वळण लागले असून, अनेक ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रामुख्याने बिंदू चौक परिसरातील पर्यटकांच्या गाड्यांना लक्ष्य करण्यात आले.