कोल्हापूर : भुदरगड तालुक्‍यात मुसळधार पाऊस (video)

Last Updated: Jun 01 2020 7:46PM
Responsive image


गारगोटी : पुढारी वृत्तसेवा

भुदरगड तालुक्यात आज सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास गारगोटी सह तालुक्यात जोरदार पाऊस झाला. सुमारे एक तास झालेल्या पावसाने रस्ते व गटारी भरून पावसाचे पाणी वाहत होते. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची त्रेधातिरपट उडाली. मात्र गेली कित्येक दिवस पेरणीच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावला आहे. तालुक्याच्या पूर्व भागात खरिपाची पेरणी झाली आहे. तर पश्चिम भाग पेरणीच्या प्रतीक्षेत होता. या पावसामुळे पश्चिम भागात पेरणीची धांदल उडणार आहे. काही शाळांच्या छप्परांना गळती लागल्यामुळे वीलगी करणात ठेवलेल्या नागरिकांची गैरसोय झाली.