Fri, Jul 19, 2019 22:29होमपेज › Kolhapur › मुख्याध्यापक संघाचा फैसला

मुख्याध्यापक संघाचा फैसला

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 23 2017 11:42PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ त्रैवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि.24) मतदान होणार आहे. सायंकाळी चारनंतर मतमोजणी होऊन निवडणुकीचा फैसला होणार आहे. सत्तारूढ छत्रपती शाहू पॅनेल की विरोधी राजर्षी शाहू लोकशाही स्वाभिमानी आघाडी बाजी मारणार याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे. 

जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची शिखर संस्था असलेल्या कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाची दीड वर्षाने उशिरा निवडणूक लागली. चेअरमन, व्हा. चेअरमन, सेक्रेटरी, जाईंट सेक्रेटरी, खजानिस व कार्यकारी सदस्य अशा 25 जागांसाठी 710 मतदान करणार आहेत. 

निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न असफल ठरल्यानंतर सत्ताधार्‍यांविरुद्ध विरोधकांनी मोट बांधल्याने निवडणूक रणधुमाळी सुरू झाली. प्रचाराचा नारळ फुटल्यापासून मेळाव्यांच्या माध्यमातून दोन्ही गटांनी आपली भूमिका मांडली. व्यक्‍तिगत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यानंतर प्रचार शांत झाला. 

निवडणूक मतदानाची तयारी पूर्ण झाली असून रविवारी सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात होईल. तीन मतदान केंद्रांवर दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर चारच्या सुमारास सहा टेबलवर मतमोजणीस प्रारंभ होऊन निकाल करण्यात येतील. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणुकीसाठी सचिव व निवृत्त सहकार विभागातील 25 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. सुधाकर शेरेकर यांनी दिली.

ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक 

निवडणूक मतदानासाठी येणार्‍या प्रत्येक सभासद, मतदाराने मुख्याध्यापकपदी कार्यरत असल्याबाबतचे शिक्षणाधिकारी यांच्याकडील शिक्षक संचमान्यता पत्र, मुख्याध्यापक नेमणूक आदेश, आधार कार्ड किंंवा मतदान ओळखपत्र अथवा मुख्याध्यापक ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.