होमपेज › Kolhapur › फेरीवाले कृती समितीच्या मेळाव्यात निमंत्रक आर. के. पोवार यांचा इशारा  

... तर महापालिकेचे गेट उघडू देणार नाही

Published On: Dec 17 2017 1:29AM | Last Updated: Dec 16 2017 11:44PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

महापालिकेने सुरू केलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम अतिशय चांगली आहे. फेरीवाल्यांना विचार करून ही मोहीम सुरू आहे. त्यामुळे आमचा त्यावर कोणताही आक्षेप नाही. मात्र, आम्हाला पक्की जागा द्या आणि हातगाडीपासून सर्व खोकीधारकांना बायोमेट्रिक कार्ड लागू करा, अशी आमची मागणी आहे. यातूनही छोट्या फेरीवाल्यांची जागा काढून घेऊन ती मोठ्या व्यावसायिकांच्या घशात घालण्याचा प्रयत्न झाल्यास महापालिकेचे गेट उघडू देणार नाही, असा इशारा कृती समितीचे निमंत्रक आर.के.पोवार यांनी मेळाव्यात बोलताना दिला. 

कोल्हापूर शहर जिल्हा सर्व पक्षीय फेरीवाला कृती समितीचा मेळावा शनिवारी जोतिबा रोडवरील सुयोग मंगल झाला. या मेळाव्याला जोतिबा रोड, ताराबाई रोड, महाव्दार रोड यांच्यासह शहरातील विविध भागांतील फेरीवाले मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आर. के. पोवार पुढे म्हणाले, शहरातील फेरीवाल्यांना जागा मिळावी, यासाठी गेली सहा महिने नियोजन सुरू आहे. त्यासाठी महापौर, आयुक्त यांच्याकडून सकारात्मक भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे कोणी ही मनात इगो करू नये.

नंदकुमार वळंजू म्हणाले, महापालिकेची अतिक्रमण निर्मूलन मोहीम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आतापर्यंत एकाही फेरीवाल्यावर अन्याय झालेला नाही, यामुळे महापालिकेवर  मोर्चा नको होता. पण कृती समितीत कसलीही फूट पडलेली नाही. सर्व संघटना एकत्र आहोत. शहरातील कोणत्याही फेरीवाल्यांवर अन्याय झाल्यास त्यासाठी धावून जावूअसे त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक अशोक भंडारे, किरण गवळी, सुरेंद्र शहा, राजू जाधव, रियाज कागदी, शांताबाई जाधव यांची भाषणे झाली. प्रास्ताविक सुरेश जरग यांनी तर आभार विलास लोहार यांनी मानले.