होमपेज › Kolhapur › बाहुबलीतील क्षेत्रपाल मंदिरात 28 हजारांची चोरी

बाहुबलीतील क्षेत्रपाल मंदिरात 28 हजारांची चोरी

Published On: Feb 20 2018 1:20AM | Last Updated: Feb 20 2018 12:40AMहातकणंगले : प्रतिनिधी

श्री श्रेत्र बाहुबली येथील दिगंबर जैन ट्रस्टच्या आवारातील श्रेत्रपाल मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारून 28 हजार 500 रुपयांचे सोने, चांदी व पंचधातूच्या दागिन्यांची चोरी केली. याबाबतची फिर्याद पुजारी बाहुबली गजानन उपाध्ये (वय 47, रा. कुंभोज) यांनी हातकणंगले पोलिस ठाण्यात दिली आहे.
कुंभोज हद्दीतील श्री श्रेत्र बाहुबली येथे रविवारी रात्रीच्या वेळी चोरट्यांनी श्रेत्रपाल मंदिरातील 2 ग्रॅम किमतीचे चांदीचे 4 डोळे, आदिनाथ भगवंतांची पंचधातूची 4 हजार रुपये किमतीची मूर्ती, तिर्थंकर भगवंतांची 1500 रुपये किमतीची पंचधातूची मूर्ती, ज्वालामालीनी देवीचे 2 हजार रुपये किमतीचे

सोन्याचे मणी मंगळसूत्र, एक फुटी भगवंतांची मूर्ती, पद्मावती देवीची 8 हजारांची चांदीची मूर्ती,  15 हजार रुपयांचे देवीचे सोन्याचे गंठण व दानपेटीतील रोख रक्‍कम असा एकूण 25 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. कोल्हापूरहून श्‍वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. परंतु, श्‍वान जागेवरच घुटमळले. घटनेची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहायक फौजदार कोळी करीत आहेत.