Sat, Dec 14, 2019 04:47होमपेज › Kolhapur › हातकणंगले : भेंडवडे ५० टक्के गाव पाण्याखालीच, मातीच्या घरांची मोठी पडझड

हातकणंगले : भेंडवडे ५० टक्के गाव पाण्याखालीच, मातीच्या घरांची मोठी पडझड

Published On: Aug 14 2019 4:56PM | Last Updated: Aug 14 2019 4:44PM
पेठवडगाव : वार्ताहर 

हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे या गावाला १० दिवस पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. यामुळे सुमारे ९० टक्के गाव पाण्याखाली आले होते. गेल्या दोन दिवसांपासून पुराचे पाणी ओसरत आहे. मात्र अद्याप ५० टक्के गाव पाण्याखाली आहे. पुराच्या पाण्याने जुनी मातीचे घरे जमीनदोस्त झाली आहेत.

गेल्या दहा दिवसांपासून पुराच्या पाण्याखाली असलेल्या या गावात दुर्गंधी पसरली आहे. येथील पाण्यामध्ये आळ्या असल्याने घरातील स्वच्छता करण्यासाठी आळी मिश्रित पाण्याचा नाईलाजाने वापर करणे भाग पडत आहे. अशा प्रदूषित वातावरणामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता असल्याने सावर्डे ग्रामीण रुग्णालयाची वैद्यकीय टीम याठिवाणी कार्यरत आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. 

राज्यातून मदतीचा ओघ सुरु आहे. औषधे, कपडे, धान्य, पाणी, चारा आदी जीवनावश्यक वस्तूंची मदत होत असल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे. मात्र बहुतांश पुरग्रस्तांच्या घराची पडझड झाली आहे. शासनाने किंवा दानशूर, सेवाभावी संस्थेनी पडलेल्या घराचे पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.