Wed, May 22, 2019 22:18होमपेज › Kolhapur › मेतकेत बाळूमामांचा भंडारा उत्सव

मेतकेत बाळूमामांचा भंडारा उत्सव

Published On: Feb 28 2018 1:16AM | Last Updated: Feb 27 2018 11:11PMहमीदवाडा : प्रतिनिधी

सद‍्गुरू बाळूमामा यांचे मूळ क्षेत्र असलेल्या मेतके (ता. कागल) येथील बाळूमामा व हालसिद्धनाथांचा भंडारा उत्सव लाखावर भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. स्वत: बाळूमामांनी 1932 मध्ये सुरू केलेल्या या मानाच्या व श्रद्धेच्या उत्सवामध्ये जवळपास 125 पोती भंडार्‍याची उधळण करण्यात आली. बाळूमामांच्या व हालसिद्धनाथाच्या नावानं... चांगभलं...चा गजर करतानाच हेडाम नृत्य व धनगरी ढोल वादनाने भाविकांना मंत्रमुग्ध केले.  

शनिवारी सायंकाळी मानाच्या टाकळी, बेडग, मालगाव, उदगाव, शिरोळ, उमळवाड, टोप, पेठवडगाव, हनमंतवाडी, घुणकी, म्हाकवे, कुर्ली, हमीदवाडा, हादनाळ, चिखळवाळ, कारदगा, खडकेवाडा आदी गावांच्या वालंगाचे तसेच भाकनूक सांगणारे भगवान ढोणे वाघापूरकर यांचे आगमन झाले. भव्य सभीना मिरवणूक पार पडली. त्यानंतर हेडामचा विशेष नृत्य सादर झाले.

तलवारीच्या सहाय्याने व भंडार्‍याच्या उधळीने हेडामचे सादरीकरण झाले. अश्‍वांची विविध थरारक प्रात्यक्षिकेही झाली. यावेळी अश्‍वांची विविध थरारक प्रात्यक्षिकेही झाली. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आदी राज्यांमधून आलेल्या लाखो भाविकांनी भंडार्‍याची उधळण यावेळी केली. मंगळवारी सकाळी महादेव गुरव यांचे काल्याचे कीर्तन, तसेच ज्ञानेश्‍वरी पारायण सांगता समारंभ झाला. पहाटे भगवान ढोणे यांची भाकनूक झाली.