Wed, Nov 21, 2018 16:28होमपेज › Kolhapur › बारावीच्या लाखो उत्तरपत्रिका बोर्डात जमा नाहीत

बारावीच्या लाखो उत्तरपत्रिका बोर्डात जमा नाहीत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बहिष्कार आंदोलनाचे हत्यार पुन्हा उपसल्याने मराठी, इंग्रजी, अकौंटन्सी या विषयांच्या लाखो उत्तरपत्रिका बोर्डात जमा करण्यासाठी नियामक फिरकले नाहीत. त्यामुळे पुन्हा बारावी परीक्षेचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता वाढली आहे.

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात बारावी परीक्षा कामकाजावर बहिष्कार आंदोलन केले होते. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने हे आंदोलन मागे घेतले गेले. परंतु, शिक्षकांच्या आर्थिक मागण्यांसंदर्भातील आदेश शासनाने न काढले नाहीत. दोन दिवसांपूर्वी महासंघाने नियामकांनी बारावी उत्तरपत्रिका व गुणपत्रक बोर्डात जमा न करण्याचे आवाहन केले होते. यास प्रतिसाद देत नियामक विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयात गेले नाहीत. त्यामुळे दोन लाखांहून अधिक उत्तरपत्रिका बोर्डात जमा झालेल्या नाहीत. 

शासनाने दिलेल्या आश्‍वासनांचा लेखी आदेश चार दिवसांत काढावा, अन्यथा बारावीचा निकाल लांबणीवर पडेल. महासंघाबरोबर चर्चा केल्याशिवाय नियामक बोर्डात उत्तरपत्रिका जमा करणार नाहीत. राज्य कार्याध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे प्रा. अविनाश तळेकर यांनी सांगितले.

 

Tags : kolhapur, kolhapur news, HSC examination, answer shit, board, deposited,


  •