Mon, May 20, 2019 22:04होमपेज › Kolhapur › उलघडले शंभर टक्के स्मरणशक्‍तीचे रहस्य

उलघडले शंभर टक्के स्मरणशक्‍तीचे रहस्य

Published On: Apr 21 2018 1:00AM | Last Updated: Apr 20 2018 11:58PMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोणतेही ज्ञान समजून घेतल्याशिवाय चिरंतन लक्षात राहत नाही. त्यामुळे पाठांतरासोबतच विद्यार्थ्यांनी आकलनशक्‍ती वाढवणे अधिक गरजेचे आहे, असे ऋषी सांस्कृतिक विद्या केंद्राचे ट्रस्टी आचार्य जगदीश भट यांनी सांगितले. यासोबतच 100 टक्के स्मरणशक्‍ती वाढवण्याच्या पाच पायर्‍या विशद केल्या. दैनिक ‘पुढारी’ अंकुर क्‍लब व ऋषी संस्कृती विद्या केंद्राच्या वतीने आयोजित मार्गदर्शन शिबिरात ते ‘शंभर टक्के स्मरणशक्‍तीचे रहस्य’ विषयावर बोलत होते. शाहू स्मारक भवन येथे हा कार्यक्रम संपन्‍न झाला. याला पालक व विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवातच अत्यंत रोचक पद्धतीने करून विद्यार्थ्यांना कशाची भीती वाटते, हे त्यांच्याकडूनच जाणून घेतले. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना स्मरणशक्‍तीच्या प्राथमिक पायर्‍या समजावल्या. यासाठी आचार्य विद्या केंद्राचे संस्थापक ऋषी प्रभाकर यांनी जी पद्धती घालून दिली आहे, त्याचा अवलंब केल्यास विद्यार्थ्यांना घोकमपट्टीपासून सुटका मिळून विषय सहजतेने समजणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले. 

इयत्ता सातवीपर्यंतचा पाया पक्‍का असला पाहिजे. ऋषी संस्कृती विद्या केंद्रात गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांची स्वआकलन क्षमता वाढवली जाते. 40 दिवसांत सर्व शालेय पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम पूर्ण करून वर्षभर विद्यार्थ्यांकडून रिव्हिजन करून घेतली जाते. यामुळे विद्यार्थी ताणरहित राहतो. सहजतेने सर्व काही आकलन करणे त्याला शक्य होते. त्यामुळे ताणतणाव न बाळगता हसत-खेळत शिकण्याचा आनंद घ्या, असेही जगदीश भट यांनी सांगीतले. 

कार्यक्रमास दैनिक ‘पुढारी’चे रिजनल मार्केटिंग मॅनेजर शशिकांत पवार, महेश शेटे, आचार्य विजय यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक आचार्य राजूजी कुकडे यांनी केले. 

100 टक्के स्मरणशक्‍तीसाठी फॉर्म्युला

एफर्टलेस रीडिंग (विनासायास जलद वाचन पद्धती पण विषय समजण्यासाठी दैनिक वाचतो तसे अभ्यासाचे पुस्तक वाचा)
आर्गनायझिंग, डिस्कशन, पॉईंट स्ट्रक्‍चर आणि ट्री चार्ट (या पद्धतीने विषयाची योग्य  व स्वत:च्या शब्दात मांडणी करा)
रीव्हिजन (ट्री चार्ट डोळ्यापुढे ठेवून दिवसातून किमान तीन वेळा उजळणी करा)
अ‍ॅप्लिकेशन (पेपर सोडवून केलेला अभ्यास पूर्ण क्षमतेने लिहण्याचा प्रयत्न करा)
स्पीडअप् (लिखाणाचे स्पीड असे बनवा ज्यामुळे 3 तासांतील किमान अर्धा तास तुम्हाला जादा वेळ मिळेल)

 

Tags : kolhapur, kolhapur news, pudhari Ankur Club, Rishi Sanskriti Vidya Kendra, Guidance Camp,