Mon, Jun 17, 2019 02:11होमपेज › Kolhapur › मनपा आरक्षित जागांसंदर्भातील  माहिती पालकमंत्र्यांनी मागविली 

मनपा आरक्षित जागांसंदर्भातील  माहिती पालकमंत्र्यांनी मागविली 

Published On: Apr 17 2018 1:53AM | Last Updated: Apr 17 2018 2:08AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरातील जागांच्या आरक्षणासंदर्भातील गेल्या वीस वर्षांतील कारभाराची माहिती महापालिका आयुक्‍तांकडून मागविली आहे. याबाबतचे पत्र त्यांच्यावतीने सोमवारी आयुक्‍तांना देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने हॉटेल सयाजीजवळील डीपी रोड आणि रमणमळ्यातील वॉटर पार्कशी संबंधित कागदपत्रांचा समावेश आहे.याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, पालकमंत्रिपद स्वीकारल्यापासून शहरासह जिल्ह्यात विकासाचा मोठा डोलाराच उभा केला आहे.

शहर रस्ते विकास कामातून जनतेवर लादलेले 500 कोटींचे टोलचे भूत पालकमंत्री पाटील यांनीच गाडले आणि विकास कामाची चुणूक दाखवून दिली. शहरात विकास कामांचा धडाका पाहून विरोधकांच्या मनात धडकी भरू लागल्याने ते पाटील यांच्यावर चुकीचे आरोप करीत सुटले आहेत. जनतेसमोर सत्य बाहेर येण्यासाठी पाटील यांनी महानगरपालिकेतील  कारभाराची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सोमवारी महापालिकेच्या आयुक्‍तांना पत्र देऊन 1995 ते 2015 या काळातील आरक्षणाची माहिती मागविली. हॉटेल सयाजी येथील डी. पी. रस्त्यांची तसेच वॉटर पार्कशी संबंधित माहिती आयुक्‍तांकडून मागविण्यात आली आहे.

Tags : Kolhapur, Guardian Minister, asked, information, regarding,  reservation,  reserved, seats